Breaking news

Maval News | विना परवाना मोदी की गॅरंटी व एनडीए जिंकवा अशा आशयाचा मजकूर असलेला फलक लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल

लोणावळा : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना निवडणूक अधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता विनापरवाना मोदी की गॅरंटी व एनडीएला जिंकवा अशा आशयाचा मजकूर असलेला फलक मुंबई पुणे एक्सप्रेस वे लगत लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात कामशेत पोलीस ठाण्यामध्ये प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऍक्ट विद्रुपीकरण विरोधी कायदा 1995 अंतर्गत मावळात अज्ञात व्यक्ती विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 204 मावळ विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात नियुक्त भरारी पथकाला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या लगत मौजे बोर तालुका मावळ गावच्या हद्दीत मच्छिंद्रनाथ छबु दाभाडे (वय 40 राहणार बोर पोस्ट करुंज) यांच्या मालकीच्या जागेत अनधिकृत 120 x 60 आकाराचा फ्लेक्स बोर्ड आढळला. सदर फ्लेक्स वर मोदी सरकार, मोदी गॅरंटी, एनडीए जिंकवा असा मजकूर आढळून आला आहे. सदर फ्लेक्स बोर्डवर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व एका शेतकऱ्याचा फोटो लावल्याचे निदर्शनास आले. त्या अनुषंगाने भरारी पथकाने कामशेत पोलीस ठाणे येथे सदरची जाहिरात विनापरवाना लावल्याने अज्ञात व्यक्ती विरोधात व जमीन मालकाविरोधात विद्रुपीकरण विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

      सदर कार्यवाही सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्या  मार्गदर्शनाखाली भरारी पथकातील महेश जगताप, सहायक पोलीस निरीक्षक किशोर शेवंती व सुनील दत्तू शिंदे त्याचबरोबर गणेश गावडे, प्रमोद काळे यांनी केली.

      याबरोबरच सर्व राजकीय पक्ष, प्रतिनिधी व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे व शासकीय परवानगीशिवाय अशा प्रकारचे फ्लेक्स बोर्ड व जाहिराती प्रमाणीकरणाशिवाय प्रसिद्ध करू नये. तसेच कुठल्याही प्रकारचे फ्लेक्स विनापरवानगी लावण्यात येऊ नयेत, लावल्यास त्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल याची सगळ्यांनी नोंद घ्यावी.

इतर बातम्या

महागाई व बेरोजगारीने त्रस्त झालेले सर्वसामान्य नागरिक आपल्याला मतदान करणार नाही याची खात्री पटल्याने भाजपाने राज्यात सर्वत्र फोडाफोडीचे राजकारण केले - निखिल कवीश्वर