Breaking news

Lonavala Breaking News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा प्लॅन सुरु आहे असे सांगणारा फोन गेला होता लोणावळ्यातून; लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोणावळा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा प्लॅन सुरु आहे अशी पोलीस नियंत्रण कक्षावर 100 क्रमांकावर माहिती देणार्‍या माथेफिरुला लोणावळ्यातून ताब्यात घेत समज देऊन सोडण्यात आले. अविनाश आप्पा वाघमारे (वय 36 वर्ष राहणार रमाबाई आंबेडकर नगर वसंतराव नाईक मार्ग साठे चाळ घाटकोपर ईस्ट मुंबई) असे या माथेफिरुचे नाव आहे. आज 2.48 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाघमारे हा लोणावळ्यातील साईकृपा हॉटेल एन एच 04 येथे आलेला असताना दारूच्या नशेत हॉटेलचे मॅनेजर किशोर पाटील यांनी पाण्याच्या बाटलीची किंमत जास्त लावल्याचा राग मनात धरून हॉटेल मॅनेजर व कर्मचारी यांना त्रास देण्याच्या उद्देशाने 100 नंबरला कॉल करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे ठार मारण्याचा प्लॅन चालू आहे अशी माहिती  फोनवरुन दिली होती. य घटनेमुळे पोलीस यंत्रणेत खळबळ माजली. ज्या नंबरवरून फोन आला होता, त्याचा शोध घेतला असता अविनाश वाघमारे नावाच्या व्यक्तीने हा फोन केला असल्याचे समजले. त्याला लोणावळ्यातून ताब्यात घेत त्याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून समज देऊन सोडण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश बावकर याप्रकरणी तपास करत आहेत.
इतर बातम्या