Breaking news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त लोणावळ्यात रक्तदान शिबिर; 61 रक्तदात्यांचा सहभाग

लोणावळा : शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त शिवसेना लोणावळा शहर व श्रध्दा ब्लड बँक लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 61 रक्तदात्यांनी सहभाग घेत रक्तदान केले. यावेळी शहर शिवसेनेच्या वतीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक रक्तदात्यास प्रशस्तिपत्रक व आकर्षक भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.

   या रक्तदान शिबिरास शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, मावळ तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, उपतालुकाप्रमुख आशिष ठोंबरे,  लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, महिला आघाडी तालुका सहसंघटिका संगिताताई कंधारे, महिला आघाडी शहर संघटिका नगरसेविका कल्पना आखाडे, उपनगराध्यक्षा संध्या खंडेलवाल, माणिक मराठे, शिवदास पिल्ले, विलास बडेकर, युवासेना मावळ तालुका अधिकारी शाम सुतार, समन्वयक जयवंत दळवी, उपशहरप्रमुख संजय भोईर, मनेष पवार, प्रविण काळे, युवासेना लोणावळा अधिकारी तानाजी सुर्यवंशी, किरण गायकवाड, सचिन पारख, संजय अडसुळे, जितेंद्र कल्याणजी, ज्ञानेश्वर येवले, डाॅ. डाॅली आगरवाल, फिरोज शेख, जाकीर खलिफा, प्रसिद्धी प्रमुख विजय आखाडे, नरेश काळवीट, शुभम हारपुडे, सुरेखा देवकर, प्रिया पवार, विभागप्रमुख भगवान देशमुख, रविंद्र टाकळकर, रतन मराठे, वसंत ढोरे, बाळासाहेब मोहोळ, विभाग संघटक परेश बडेकर, शेखर कारके, मंगेश येवले, प्रशांत आजगेकर, नितीन सोनवणे, शंकर नाणेकर, रामभाऊ थरकुडे, राकेश कालेकर, दत्ता थोरवे, संतोष मेंढरे, ओमकार फाटक, विवेक भांगरे, अमित कदम, गणेश फरांदे, श्रीकांत कंधारे, गणेश वाडकर, मारुती जाधव, कुणाल धीरज घारे, संजय जाधव, राजेंद्र ढाकोळ, रुपेश वीर, दिलीप झोरे, शिवराज चव्हाण, अर्जुन चव्हाण, विकास घाटे, अविष्कार फाटक, लखन खरात आदी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

इतर बातम्या