Breaking news

Lonavala News l मावळ तालुका तायक्वांदो असोसिएशनचा 26 वा वर्धापनदिन साजरा

लोणावळा : मावळ तालुका तायक्वांदो असोसिएशनचा 26 वा वर्धापन लोणावळ्यातील संत ज्ञानेश्वर विद्यालय, भांगरवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी संस्थेचे सचिव हर्षल होगले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नविन वर्ष चालू झाले आहे. सर्वांनी चांगला अभ्यास करा, मोठं व्हावा, शालेय शिक्षण घेता असताना स्वसंरक्षणाचे धडे सुध्दा सर्व विद्यार्थ्यांनी घेतले पाहिजे असे त्यांनी सांगितले. मागील 26 वर्ष पालकांनी आपल्या संस्थेवर विश्वास दाखवला आणि यातून आपल्या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत सहभाग घेऊन अनेक गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि ब्रांझ मेडल मिळवली आहे. मागील वर्षभरात ज्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धामध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार यानिमित्त करण्यात आला. तसेच सर्व प्रमुख मान्यवरांचे सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मास्टर विक्रम बोभाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अमित दळवी, अंकुश शिर्के, सहादू मांडेकर, गुरकुल शाळेच्या शिक्षिका वंदना पडवळ आदी मान्यवर तसेच मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शितल तारे, यश बोभाटे, शिवानी तिकोन यांनी केले

2023 ऑलम्पिक वीर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार तसेच शिव छत्रपती गौरव पुरस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मास्टर विक्रम बोभाटे यांना मिळाल्याबद्दल सर्व विद्यार्थी आणि पालकांच्या वतीने बोभाटे सरांचा विशेष सत्कार करण्यात आला.

इतर बातम्या