Breaking news

पवना धरण परिसरात बुधवारी 24 तासात 232 मिमी पाऊस; धरणातील पाणीसाठा 55 टक्के

पवनानगर : मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणार्‍य‍ा पवना धरण परिसरात बुधवारी 24 तासात 232 मिमी ऐवढ्या पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली असून धरणात आज मितीला 55.07 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. मागील 24 तासात धरणाच्या पाणीसाठ्यात 9.99 टक्के ऐवढी वाढ झाली आहे.

    मावळ तालुक्यात मागील चार ते पाच दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मावळातील अनेक नद्यांना पुर आला आहे. पवना धरण परिसरात 1 जूनपासून आजपर्यंत 1124 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

इतर बातम्या