Breaking news

एकविरा गडावरून उतरताना कार झाली पलटी; सहा जण जखमी

लोणावळा : कार्ला येथील एकविरा देवीच्या गडावरुन दर्शन घेऊन खाली उतरताना उतारावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने एक कार पलटी झाल्याने सहा भाविक जखमी झाले आहेत. सर्व भाविक आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी आले होते. गडावरून खाली उतरत असताना MH 04 AY 1295 च्या चालकाचा उतार व वळणावर गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या बाजुला पलटी झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही.

इतर बातम्या