Breaking news

लोणावळ्यात सापडलं नवजात स्त्री जातीचे अर्भक

लोणावळा : येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या मागील बाजूला एक्स्प्रेस वे च्या पुलाखाली नदीच्या कडेला एक नवजात स्त्री जातीचे मृत अर्भक लोणावळा पोलिसांना मिळून आले आहे. 

       याप्रकरणी पोलीस नाईक संदीप मानकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात भादवी कलम 318 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोणीतरी अज्ञात व्यक्तीने स्त्री जातीचे नवजात अर्भक फडक्यात गुंडाळून स्त्री अपत्य जन्माची लपवणुक करण्याच्या हेतूेने गुप्तपणे टाकून दिले होते. पोटच्या गोळ्याला अशा निर्दयीपणे टाकून देण्याचा हा प्रकार कोणी केला याचा शोध सुरू असून घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महादेव म्हात्रे करत आहेत.

इतर बातम्या