Breaking news

कुसगाव खु. जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताकदिन विविध कार्यक्रमांनी साजरा

कामशेत : कुसगाव खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारतीय प्रजासत्ताकदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल लालगुडे व सर्व सदस्य यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. 

  यावेळी माजी सरपंच गणेश लालगुडे, काळूराम लालगुडे सर्व सदस्य  मुख्याध्यापक हेमलता गायकवाड व मान्यवर उपस्थित होते. शाळेच्या उपशिक्षक नीचीत मॅडम, संगीता मॅडम यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे सुंदर असे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्त देखील यावेळी उपस्थित होते.

इतर बातम्या