Breaking news
महागाई व बेरोजगारीने त्रस्त झालेले सर्वसामान्य नागरिक आपल्याला मतदान करणार नाही याची खात्री पटल्याने भाजपाने राज्यात सर्वत्र फोडाफोडीचे राजकारण केले - निखिल कवीश्वर

ठळक बातम्या

लोणावळा

Lonavala News | अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन लोणावळा शाखा यांचा शपथ ग्रहण सोहळा संपन्न; नूतन कार्यकारणी जाहीर

लोणावळा : अखिल भारतीय मारवाडी महिला संघटना लोणावळा यांचा लोणावळा येथील विरंगळा केंद्र येथे पदग्रहण समारंभ संपन्न झाला. या पदग्रहण समारंभाची थीम ही पर्यावरण पूरक होती.      यावेळी प

Kaivalydhama Yog Sansthan | कैवल्यधाम योग संस्थेत 1 जून पासून सुरू होणार मोफत निसर्गोपचार परिचारिका कोर्स

लोणावळा : जगप्रख्यता योग संस्था म्हणून प्रसिध्द असलेल्या लोणावळा शहरातील कैवल्यधाम (Kaivalydhama) योग संस्थेमध्ये येत्या 1 जून पासून मोफत निसर्गोपचार (प्राकृतिक चिकित्सा उपचार) परिचारिका कोर्स सु�

क्राईम न्युज

Lonavala Accident News | जुन्या मुंबई पुणे महामार्गावर भरधाव कार वळणावर उलटली; दोन जणांचा मृत्यू तर 3 जण जखमी

लोणावळा : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर टाकवे खुर्द गावाजवळ वळणावर भरधाव वेगातील कार पलटी होऊन रस्त्याच्या साईटला खड्ड्यात पडल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहे. 28 एप्रिल रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात झाला आहे. याप्रकरणी कार चालक प्रवीण नागू लोहार (वय 34, रा. पवळे, सध्या राहणार मळवली) यांच्यावर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भादवी कलम 304 (A), 279, 337, 338 मोटर वाहतूक कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मयुर ज्ञानेश्वर पंडीत (वय 26 वर्षे, रा.मळवली) यांनी अपघाताची फिर्याद दिली आहे.      या अपघातात बबन राघु सुतार (वय 50 वर्षे रा. वडगाव मावळ म्हाळसकर कॉलनी), आर्यन ज्ञानेश्वर भालेकर (वय 10 वर्षे रा. जाधववाडी नवलाख उंबरे) यांचा मृत्यू झाला असून मयुर ज्ञानेश्वर पंडीत (वय 26 वर्षे रा.मळवली), प्रविण नागू लोहार (वय 34 वर्षे रा. पवळे, सध्या राहणार मळवली), रक्तेश बाबसाहेब सोनवणे (वय 21 वर्षे रा.भाजे) हे जखमी झाले आहेत.      फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत व जखमी हे सर्व जन कार क्रमांक (MH.14 FS.6578) मधून कार्ला फाटा येथून पुण्याच्या दिशेने जात असताना टाकवे गावाजवळ वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली जाऊन खड्ड्यात पडली. यामध्ये गंभीर मार लागल्याने दोघांचा मृत्यू झाला तर चालकासह तीन जण जखमी झाले आहेत.      याप्रकरणी लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक भारत भोसले हे पुढील तपास करत आहेत.

मावळ

Maval Loksabha Election | मावळ लोकसभेसाठी 33 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी 2 जणांची माघार

मावळ माझा न्युज नेटवर्क : मावळ लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या (29 एप्रिल) अखेरच्या दिवशी मावळ लोकसभा मतदारसंघातून अपक्ष भाऊसाहेब आडागळे व धर्मपाल तंतरपाळे या दोन उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे या मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, 33 उमेदवार रिंगणात असणार आहेत. असे असले तरी मुख्य लढत ही महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे व महायुतीचे श्रीरंग बारणे यांच्यातच होणार आहे.        मावळ लोकसभा मतदारसंघातून 38 उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी छाननीमध्ये तीन अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद झाले, तर 35 उमेदवार पात्र ठरले होते. अर्ज माघारी घेण्याची सोमवारी अंतिम मुदत होती. त्यामध्ये दोन उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात 33 उमेदवार राहिले आहेत.        मावळ लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे मशाल हे चिन्ह घेऊन या निवडणुकीमध्ये उतरले असून मागील काही दिवसांपासून त्यांचा जोरदार प्रचार देखील सुरू आहे. महायुतीच्या वतीने शिवसेना शिंदे पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली असून धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन ते या निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणार आहेत. वंचित बहुजन पार्टीच्या वतीने माधवी जोशी यांना रिक्षा हे निवडणूक चिन्ह मिळाले असून त्यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराला सुरुवात केली आहे. आज अर्ज माघारी नंतर व चिन्ह वाटपानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी व महायुती यांच्याकडून प्रचाराचे रणधुमाळी सुरू झाली असून दोघांचेही कार्यकर्ते घरोघरी जाऊन निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वत्र प्रयत्न करत आहेत.

पिंपरी चिंचवड

Maval Loksabha Election | मावळ लोकसभेच्या रिंगणात 33 उमेदवार; चिन्ह वाटपात अपक्षांना चिमणी, सफरचंद, खाट, किटली, बॅट, दुर्बीण, नरसाळे अशी चिन्हं वाटप

मावळ माझा न्युज नेटवर्क : मावळ लोकसभेसाठी तब्बल 33 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणार आहेत. या उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्याची प्रक्रिया आज पार पडली असून  निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी दिपक सिंगला यांनी चिन्ह वाटप जाहीर केले.       राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांना त्या पक्षांसाठी राखीव असलेली चिन्हे देण्यात आली. नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अन्य उमेदवारांना भारतीय निवडणूक आयोगाने सूचीबद्ध केलेल्या 190 मुक्त चिन्हांमधून उमेदवारांनी दिलेला पसंतीक्रम, त्यांची मागणी विचारात घेऊन तसेच लहान मुलीच्या हस्ते सोडत पद्धतीने चिन्ह वाटप करण्यात आले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले, समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे, हिम्मतराव खराडे, निवडणूक सहाय्यक तथा तहसीलदार अभिजीत जगताप, मनिषा तेलभाते, सचिन मस्के यांच्यासह नामनिर्दिष्ट उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीचे निवडणुक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी येथील निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये चिन्ह वाटप प्रक्रिया भारत  निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनूसार पार पडली.प्रत्यक्ष निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे, पक्ष आणि चिन्ह :1] राजाराम नारायण पाटील (बहुजन समाज पार्टी) - हत्ती2] श्रीरंग आप्पा चंदू बारणे (शिवसेना) - धनुष्यबाण 3] संजोग भिकू वाघेरे पाटील [शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)] - मशाल 4] गोविंद गंगाराम हेरोडे (बहुजन मुक्ती पार्टी) – खाट5] ज्योतीश्वर विष्णु भोसले (बळीराजा पार्टी) - ऊस शेतकरी6] तुषार दिगंबर लोंढे (बहुजन भारत पार्टी)  - शिट्टी7] पंकज प्रभाकर ओझरकर (अखिल भारतीय परिवार पार्टी) - किटली 8] प्रशांत रामकृष्ण भगत (भारतीय जवान किसान पार्टी) - भेटवस्तू9] महेश नारायणसिंग ठाकूर (धर्मराज्य पार्टी) - बॅट 10] माधवीताई नरेश जोशी (वंचित बहुजन आघाडी)  - ऑटोरिक्षा11] यशवंत विठ्ठल पवार (क्रांतिकारी जय हिंद सेना)  - गॅस सिलेंडर12] रफीक रशीद कुरेशी (देश जनहित पार्टी) - शाळेचे दप्तर13] रफिक मैनुद्दीन सय्यद (आझाद समाज पार्टी) - पेनाची निब सात किरणांसह14] शिवाजी किसन जाधव (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक) - सिंह15] संतोष मगरध्वज उबाळे (भीमसेना) - जेवणाचे ताट 16] इंद्रजीत धर्मराज गोंड (अपक्ष) - अंगठी17] मुकेश मनोहर अगरवाल (अपक्ष)  - कपाट 18] प्रफुल्ल पंडीत भोसले (अपक्ष)  - हिरा19] मधुकर दामोदर थोरात (अपक्ष) - टायर 20] राहुल निवृत्ती मदने (अपक्ष)  - ट्रक 21] सुहास मनोहर राणे (अपक्ष)  - टॉर्च बॅटरी22] मनोज भास्कर गरबडे (अपक्ष)  - शिवणयंत्र23] उमाकांत रामेश्वर मिश्रा (अपक्ष)  - कॅमेरा 24] लक्ष्मण सदाशिव अढाळगे (अपक्ष)  - टीव्ही25] इकबाल इब्राहिम नावडेकर (अपक्ष)  - जहाज26] अजय हनुमंत लोंढे (अपक्ष) - नरसाळे27] अँड. राजू लालसो पाटील (अपक्ष)  - सफरचंद 28] दादाराव किसन कांबळे (अपक्ष)  - प्रेशर कुकर29] चिमाजी धोंडिबा शिंदे (अपक्ष)  - दुर्बिण30] राजेंद्र मारूती काटे (अपक्ष) - नारळाची बाग 31] हजरत इमामसाहब पटेल (अपक्ष)  - ड्रिल मशिन32] मारूती अपराई कांबळे (अपक्ष)  - तुतारी33] संजोग रविंद्र पाटील (अपक्ष) - चिमणी

Video News

अन्य बातम्या

समस्त महाजन चॅरिटेबल ट्रस्ट ची आढावा बैठक ठाण्यात संपन्न

मावळ माझा न्युज : समस्त महाजन चॅरिटेबल ट्रस्ट यांची वर्षभरातील कार्याचा आढावा घेणारी बैठक ठाणे येथील टीप टॉप प्लाझामध्ये पार पडली. अहमदाबाद येथील हिंदू साधू समितीचे अध्यक्ष स्वामी परमतानंदजी व जैन आचार्य लोकेश मुनीजी यांच्या अध्यक्षतेखाली ट्रस्टच्या वर्षभराच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.        यावेळी बोलताना आचार्य लोकेश मुनीजी म्हणाले, समस्त महाजन चॅरिटेबल ट्रस्ट ही संपूर्ण भारतामध्ये पशु वैद्यकीय उपचार साठी व प्रत्येक गाव खेड्यामध्ये जल व्यवस्था करण्यासाठी अनमोल कार्य करत आहे. तसेच त्यांनी प्रत्येक गावामध्ये देशी वृक्ष लावण्याचा जो संकल्प केलेला आहे तो कौतुकास्पद आहे.        आचार्य परमतानंदजी म्हणाले, समस्त महाजन चॅरिटेबल ट्रस्ट यांनी यावर्षी 35 कोटी रुपयांचे सामाजिक कार्य केलेले आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे. व भारत सरकारच्या जिवंत पशु विक्रीच जी व्यवसायाला परवानगी देण्यात आलेली होती त्यास त्यांनी केलेला विरोधामुळे भारत सरकारला त्या निर्णयावर फेर विचार करावा लागला. त्यांच्या अहिंसा प्रेमी कार्यास त्यांनी शुभेच्छा आशीर्वाद दिले. सदर कार्यक्रमाच्या वेळी समस्त महाराजांचे अध्यक्ष गिरीश भाई शहा, परेशभाई शहा, भाजपा उद्योग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश पोरवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.        महाराष्ट्रातील हजारो गोरक्षक यांना मार्गदर्शन करताना गिरीश भाई शहा यांनी महाराष्ट्रामध्ये कायमस्वरूपी पाणी प्रश्न सुटावा व पशु कत्तलखाने बंद व्हावे म्हणून मार्गदर्शन केले. व आतापर्यंत त्यांनी 50 हजार पेक्षा जास्त पशुवर उपचार करत त्यांना जीवनदान दिले असल्याचे सांगितले. यावेळी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान येथील हजारो अहिंसा प्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.

Mavalmaza android application

Coming soon..