Breaking news

Lonavala News | अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन लोणावळा शाखा यांचा शपथ ग्रहण सोहळा संपन्न; नूतन कार्यकारणी जाहीर

लोणावळा : अखिल भारतीय मारवाडी महिला संघटना लोणावळा यांचा लोणावळा येथील विरंगळा केंद्र येथे पदग्रहण समारंभ संपन्न झाला. या पदग्रहण समारंभाची थीम ही पर्यावरण पूरक होती.

      यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून पर्यावरण पक्षीप्रेमी डॉक्टर सीमा शिंदे आणि लोणावळ्याच्या माजी नगरसेविका बिंद्रा गणात्रा उपस्थित होत्या. या पदग्रहण समारंभाची सुरुवात दीप प्रज्वलन व बिलवा मोरे हिच्या गणेश वंदनाने झाली. या पदग्रहण समारंभा मध्ये मारवाडी महिला संघटना अध्यक्षपदी संध्या सुनील खंडेलवाल तर सचिवपदी अमृता लुनावत, कोषाध्यक्षपदी लता गुप्ता, पर्यावरण प्रमुख पदी अनीता खंडेलवाल, नेत्रदान अंगदान प्रमुख स्वाती खंडेलवाल, रक्त त्वचा देहदान संगीता  भुरट, महिला सशक्तिकरण पार्वती सोहनराज रावल, बाल विकास विजया गुप्ता, जनसंपर्क प्रमुख पिंकी अमोल अग्रवाल, संस्कार संकृती  साहित्य शशि ध्रुव अग्रवाल, संबंध समन्वय कीर्ति  गुप्ता, तकनीकी प्रिया संजय रावल, समिति  सशक्तिकरण राजश्री गिरीश खंडेलवाल, सल्लागार संगीता भुरट,साधना देवेन्द्र टाटिया यांची निवड करण्यात आली.

   डॉक्टर सीमा शिंदे यांनी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बद्दल माहिती दिली. वाढत्या तापमानामुळे माणसांची एवढी घालमेल होते तर पक्षी प्राणी यांची काय अवस्था होत असेल. त्यासाठी यांच्या संस्थेमार्फत पक्षांचे घरटे आणि पिशव्या उपस्थितांना भेट देण्यात आल्या.

लोणावळा येथील संगीता भुरट यांची प्रांतीय पर्यावरण पदी तर श्रीमती साधना टाटिया यांची  प्रांतीय समिती सशक्तीकरण पदी  निवड करण्यात आली. 

      या कार्यक्रमाच्या निमित्त पाहुण्यांना  चिमण्यांची घरटी देण्यात आली. वेगवेगळ्या अकरा समित्यांच्या प्रमुख यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती साधना टाटिया यांनी केले. या कार्यक्रमाची सांगता विरंगुळा केंद्र येथील ज्येष्ठ नागरिकांच्या  पर्यावरणावर आधारित अशा सुंदर गाण्याने करण्यात आली.

इतर बातम्या