Breaking news

Kaivalydhama Yog Sansthan | कैवल्यधाम योग संस्थेत 1 जून पासून सुरू होणार मोफत निसर्गोपचार परिचारिका कोर्स

लोणावळा : जगप्रख्यता योग संस्था म्हणून प्रसिध्द असलेल्या लोणावळा शहरातील कैवल्यधाम (Kaivalydhama) योग संस्थेमध्ये येत्या 1 जून पासून मोफत निसर्गोपचार (प्राकृतिक चिकित्सा उपचार) परिचारिका कोर्स सुरू करण्यात येणार आहे. हा कोर्स सहा महिने कालावधीचा असून तो पूर्ण झाल्यानंतर सहा महिने याच ठिकाणी इन्टर्नशिप करण्याची संधी देण्यात येणार आहे. 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हा संपूर्ण कोर्स पूर्णतः मोफत असणार आहे. मात्र याकरिता 10 हजार रुपये डिपाॅझिट म्हणून जमा करावे लागणार आहेत. ती रक्कम प्रमाणपत्रासोबत परत केली जाणार आहे.

     या कोर्स मध्ये पूर्ण थेरपी देण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये निसर्गोपचार (प्राकृतिक चिकित्सा), जल चिकित्सा, मसाज थेरपी, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, डाएट थेरपी शिकवली जाणार आहे. कोर्स मध्ये 6 महिने प्रत्यक्ष प्रशिक्षण (प्रॅक्टीकल ट्रेनिंग) असणार आहे. हा 1 वर्ष कोर्स पूर्णतः मोफत असणार आहे. त्यानंतर सर्टिफिकेट दिले जाईल. स्थानिक नागरिकांना या कोर्स साठी प्राधान्य देण्यात येणार आहे. कोर्सला प्रवेश घेण्यासाठी किमान दहावी शिक्षण गरजेचे आहे. प्रशिक्षणार्थींना याठिकाणी रहाण्याची व जेवणाची व्यवस्था मोफत असणार आहे. प्रशिक्षणार्थी हे शारीरिक दृष्ट्या निरोगी (मेडिकल फिट) असावा. 1 जून पासून हा कोर्स सुरू होणार असल्याने लोणावळा व मावळ परिसरातील नागरिकांनी तसेच इतर भागातील नागरिकांनी लवकरात लवकर संपर्क साधत आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन कैवल्यधाम योग संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

     कोर्स संदर्भातील अधिक माहितीसाठी डॉ. संतोष पांडे यांना - 7600876167 या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच अधिक माहितीसाठी www.kdham.com या वेब साईटला भेट देऊन माहिती घेऊ शकता. व कार्यालयीन वेळेत +91 7262026878 / 02114 - 273001 संपर्क साधावा.

इतर बातम्या