Breaking news

Lonavala : स्वराज्यनगर येथे दोन झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्याने रस्ता बंद

लोणावळा : स्वराज्यनगर येथील चढावर सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास दोन झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याने संपूर्ण रस्ता बंद झाला आहे. बापदेव मंदिरापासून चढण चढून वर आल्यावर समोरच हा प्रकार घडला आहे. याबाबत लोणावळा नगर परिषदेच्या वृक्ष विभागाला कळवण्यात आले असून लवकरच सदरच्या फांद्या बाजूला करत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाईल. तोपर्यंत चारचाकी वाहनांना जिजामाता नगर, डेनकर कॉलनी बाजूने पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागणार आहे.  या मार्गावरून सतत वाहनांची वर्दळ सुरू असते. सुदैवाने ही घटना घडली तेव्हा याठिकाणी कोणी नव्हते. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सादर फांद्या बाजूला काढत रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

इतर बातम्या