Breaking news

चर्चा तर होणारच ! भर चौकात रस्त्याच्या मधोमध गाडी उभी करणार्‍या त्या वाहनचालकावर गुन्हा दाखल होणार की अन्य …?

लोणावळा : छत्रपती शिवाजी महाराज चौकात मधोमध चार चाकी गाडी उभी करत, सार्वजनिक वाहतुकीचा खोळंबा तसेच हिंदू धर्मीय शोभायात्रेला अडथळा करत निघून गेलेल्या त्या कारच्या चालकावर लोणावळा शहर पोलीस गुन्हा दाखल करणार की अन्य  याबाबत चर्चा रंगली आहे.

     गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील हिंदू समिती लोणावळा शहर व ग्रामीण यांच्यावतीने हिंदू नववर्ष स्वागत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली येत असताना चौक तसेच रस्ते मोकळे ठेवणे गरजेचे असताना देखील लोणावळा शहर चा एकही पोलीस कर्मचारी कोणत्याही चौकात हजर नव्हता. वरिष्ठ अधिकार्‍यांना याबाबत कळविल्यानंतर कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचार्‍यांची पळापळ सुरु झाली. व चौकात वाहतुकीसाठी अडथळा केलेल्या त्या चारचाकी गाडीच्या चालकाचा शोध सुरु झाला. मात्र रॅली चौकात दाखल झाली तरी चालक गाडीपाशी आला नाही. जवळपास अर्धा ते पाऊण तास गाडी रस्त्याच्या मधोमधी थांबलेली असताना त्याच्यावर कारवाई करण्याचे अथवा टोचन व्हॅनद्वारे सदर गाडी बाजुला करत रॅलीसाठी रस्ता मोकळा करण्याचे सौजन्य पोलिसांनी दाखविले नाही. यावरुन लोणावळा शहर पोलिसांची कर्तव्य तत्परता दिसून येत आहे. रॅली संपत आल्यानंतर सदरचा कार चालक गाडीजवळ आला. त्याला त्याठिकाणी उपस्थित असणारे पोलीस कर्मचारी यांनी पोलीस ठाण्यात नेहले आहे. मात्र सार्वजनिक ठिकाणी अशा पद्घतीने रस्त्याच्या मधोमध गाडी उभी करणे, हिंदू धर्मीयांची भव्य शोभायात्रा येत असताना तीला अडथळा निर्माण करणे असा प्रकार करणार्‍या त्या वाहन चालकावर लोणावळा शहर पोलीस गुन्हा दाखल करणार की अन्य… हे पाहणे आता औत्स्युक्याचे ठरणार आहे.

इतर बातम्या

वसंत व्याख्यानमाला | कारगिल टायगर हिल्सवर 150 जणांच्या विरोधात आम्ही 7 जण लढलो, डोळ्यातून - नाकातून रक्त गळत होते, अंगभर गोळ्या होत्या मात्र लढण्याची जिद्द व आत्मविश्वास कायम होता - परमवीर चक्र विजेते योगेंद्र सिंह याद