Breaking news

लोहगड व विसापूर किल्ल्यावरून येणाऱ्या सर्व शिवज्योतींचे कार्ला येथे स्वागत

मावळ माझा न्यूजचा WhatsApp Group जॉईन करा व बातम्यांचे Update मिळवा क्षणाक्षणात

लोणावळा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मावळ तालुक्यातील लोहगड व विसापूर या किल्ल्यावरून शिवज्योती प्रज्वलित करत घेऊन जाणाऱ्या शिवभक्तांचे कार्ला गावामध्ये स्वागत करण्यात आले तसेच शिवभक्तांना अल्पोपहाराचे देखील वाटप करण्यात आले. मागील अकरा वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.

     छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीप्रमाणे येणारा जन्मोत्सव सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. महाराष्ट्रातून विविध भागातून शिवभक्त कार्ला नगरीच्या शेजारी असलेल्या लोहगड व विसापूर या किल्ल्यांवर शिवज्योती प्रज्वलित करण्यासाठी येत असतात. या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे आशीर्वाद घेत शिवज्योत प्रज्वलित करत ती आपापल्या गावांमध्ये घेऊन जातात. या सर्व शिवभक्तांचे व शिवज्योतींचे कार्ला गावामध्ये स्वागत केले जाते. यामध्ये परिसरातील वारकरी सांप्रदायातील प्रवचनकार, किर्तनकार व कार्ला ग्रामस्थांची मोठी उपस्थिती असते.

मावळ माझा न्यूजचा WhatsApp Group जॉईन करा व बातम्यांचे Update मिळवा क्षणाक्षणात

       पहाटे 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत शेकडो शिवज्योतींचे स्वागत व हजारो शिवभक्तांना अल्पोपाहाराचे वाटप याठिकाणी करण्यात आले. यावेळी ह.भ.प गणेश महाराज फलके, ह.भ.प दिलीप महाराज खेंगरे, ह.भ.प प्रकाश महाराज जाधव, ह.भ.प सोमनाथ महाराज सावंत, ह.भ.प अनंता महाराज शिंदे, ह.भ.प अकुंश महाराज वाघीरे, ह.भ.प भाऊसाहेब मापारी आदी उपस्थीत होते. कार्यक्रमासाठी दिलीप विठ्ठल हुलावळे, बाळु रघुनाथ हुलावळे, सचिन शिर्के, भाऊसाहेब हुलावळे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन विशाल भाऊसाहेब हुलावळे यांनी केले होते.

इतर बातम्या