वाकसई ग्रुप ग्रामपंचायत l वाकसई - जेवरेवाडी या 5 कोटी 33 लक्ष रुपयांच्या काँक्रिट रस्त्याचे लोकार्पण

लोणावळा : वाकसई ग्रुप ग्राम पंचायत हद्दीत पीएमआरडीए सदस्या दिपालीताई दिपक हुलावळे यांच्या पीएमआरडीए फंडातुन 5 कोटी 33 लक्ष रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या वाकसई ते जेवरेवाडी या काँक्रीट रस्त्याचे लोकार्पण आज खासदार श्रीरंग बारणे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे, मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके, पीएमआरडीए सदस्या दिपालीताई हुलावळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी वाकसई गावच्या लोकनियुक्त सरपंच सोनाली मनोज जगताप, मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे मा. चेअरमन बाळासाहेब भानुसघरे, संचालक भरतभाऊ येवले, संचालीका सुनिता अमोल केदारी, तालुका राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष गणेश आप्पा ढोरे, तालुका राष्ट्रवादीचे नेते संतोषभाऊ राऊत, उपसरपंच मारुती भरत येवले, सदस्य शाम विकारी, भारत देसाई, जयश्री काशिकर, जयश्री देशमुख, रूपाली शेलार, सोनल इंगुळकर, वर्षा येवले, मंगल ढाकोळ, गणेश आहेर, ग्राम विकास अधिकारी गुडसुरकर, वाकसई सासायटीचे चेअरमन खंडु येवले आर.पी.आय चे नेते विजय देसाई, जेष्ठ नेते सदाशिव आहेर, गणपत विकारी, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राष्ट्रवादी युवकचे सचिव अमोल केदारी यांनी केले.