Breaking news

Maval News l मावळ तालुक्यातील दुर्गम भागात प्रौढ साक्षरतेचा नवा प्रारंभ

मावळ माझा न्युज नेटवर्क l रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थ यांच्या आर्थिक सहाय्याने आणि पुढाकाराने, तसेच शिव विद्या प्रतिष्ठान या अंमलबजावणी संस्थेच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील वडवली-वळवंती येथील आदिवासी कुटुंबांतील महिला व पुरुष, तसेच शेलारवाडी येथील घरकामगार व शेतकरी महिलांसाठी प्रौढ साक्षरता वर्गाची सुरुवात करण्यात आली.

     या उद्घाटनप्रसंगी रोटरी क्लब 3131 चे माजी जिल्हा गव्हर्नर रवी धोत्रे, रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थच्या अध्यक्षा शांती श्रीधर, आणि प्रकल्पप्रमुख रोटेरियन के. तारानाथ यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले व साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले. या उपक्रमासाठी त्यांनी भरभरून प्रोत्साहन दिले. कार्यक्रमास रोटेरियन जे. श्रीधर, रोटेरियन कृष्णा भंडारी आणि रोटेरियन दीपक ठक्कर यांचीही उपस्थिती लाभली. शिव विद्या प्रतिष्ठानच्या प्रमुख शिल्पा कशेळकर आणि संतोष वंजारी यांनी संस्थेच्या महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास कार्यक्रम आणि प्रौढ साक्षरता अभ्यासक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली.

     या उपक्रमामध्ये 'एकी महिला अधिकार संघटना'च्या प्रमुख माया वंजारी, प्रौढ साक्षरता वर्गाच्या शिक्षिका सारिका सोनवणे व ज्योती शेलार, तसेच कार्यकर्ते धनंजय शेलार यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. साक्षरता वर्गासाठी नोंदणी केलेल्या सर्व महिला विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती हे उपक्रमाच्या यशस्वीतेचे प्रतीक ठरले.


इतर बातम्या

दिव्यांग सक्षमीकरणाला चालना देणे ही सामूहिक जबाबदारी; दिव्यांग व्यक्तींना केवळ सहानुभूती नव्हे, तर सक्षमपणे जगण्यासाठी संधी व आधार देणं गरजेचं आहे – आमदार सुनील शेळके