Breaking news

दिशा महिला बचत गट पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली

तळेगाव दाभाडे : दिशा महिला बचत गट सदस्यांच्या सहकारी पतसंस्था, तळेगाव दाभाडे येथील संचालक मंडळाची निवडणूक आज उत्साही आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. विशेष म्हणजे ही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध झाली असून, यामुळे संस्थेच्या सदस्यांमध्ये समाधानाची भावना आहे.

     निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक अधिकारी राकेश निखारे, कार्यलक्षी संचालक यशवंत लिमये, सचिव डॉ. वासंती ताठे आणि व्यवस्थापिका अरुणा पवार यांनी उपस्थित राहून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली.

    संस्थेच्या नव्या कार्यकारिणीत सर्व संचालकांच्या एकमताने अध्यक्षपदी सौ. सारिका माणिक नवले, तर उपाध्यक्षपदी सौ. संगीता रामदास घोजगे यांची निवड करण्यात आली. ही बिनविरोध निवड संस्थेच्या संघटित आणि सकारात्मक वातावरणाचे प्रतीक मानली जात आहे.

     नवीन कार्यकारिणीकडून महिला सबलीकरण, पारदर्शक प्रशासन आणि संस्थेच्या आर्थिक स्थैर्यासाठी प्रभावी पावले उचलली जातील, अशी अपेक्षा सदस्यांमधून व्यक्त होत आहे. नव्या संचालक मंडळाच्या निवडीनंतर विविध सामाजिक क्षेत्रांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ही निवड संस्थेच्या प्रगतीचा नवा अध्याय ठरेल, असा विश्वास संस्थेचे सदस्य आणि हितचिंतक व्यक्त करत आहेत.

इतर बातम्या

दिव्यांग सक्षमीकरणाला चालना देणे ही सामूहिक जबाबदारी; दिव्यांग व्यक्तींना केवळ सहानुभूती नव्हे, तर सक्षमपणे जगण्यासाठी संधी व आधार देणं गरजेचं आहे – आमदार सुनील शेळके