सर्जनशीलतेच्या नावाखाली ओटीटीवरील शिवीगाळ, असभ्यता, अश्लीलते बाबत सरकार गंभीर : केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर

नागपूर (अमिन खान) : ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमात, अश्लीलता आणि असभ्य भाषेच्या वाढत्या वापराबद्दल केंद्र सरकार गंभीर आहे, अशी माहीती केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी रविवारी (19 मार्च) दिली.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवल्या जाणाऱ्या भडक आणि अश्लील कंटेंट विषयी बोलतांना त्यांनी हे ही स्पष्ट केले, की सर्जनशीलतेच्या नावाखाली जर कोणी असभ्य शिवीगाळ करत असेल तर ते सहन केले जाणार नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मवर वाढती शिवीगाळ आणि अश्लील दृश्याविषयी येणाऱ्या तक्रारींबद्दल सरकार गंभीर आहे. जर यासाठी नियमात काही बदल करण्याची गरज भासली तर मंत्रालय त्या दिशेनेही विचार करेल. नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.