Breaking news

Breaking News : एक्सप्रेस वेवर ट्रक जळून खाक

खोपोली : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आज सायंकाळच्या सुमारास एक ट्रक जळून खाक झाला. खोपोली एक्झिट जवळ सदरची घटना घडली आहे. ट्रकला आग लागल्याची माहिती समजतात खोपोली फायर ब्रिगेड, देवदूत यंत्रणा, आयआरबी यंत्रणा यांना व अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते यांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाच्या सहाय्याने सदरची आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र या दुर्घटनेमध्ये ट्रक जळून खाक झाला आहे. ट्रकला भीषण आग लागल्याने या मार्गावरील वाहतूक रोखून धरण्यात आली होती तर काही वाहने खोपोली शहरातून वळविण्यात आली होती. यामुळे दोन्ही मार्गिकांवर काहीकाळ वाहतूककोंडी होऊन लांबवर वाहनांच्या र‍ांगा लागल्या होत्या.

इतर बातम्या