Expressway Accident l द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील नवीन बोगद्यात तीन वाहनांचा अपघात; एकाचा मृत्यू

खोपोली (प्रतिनिधी) : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील नवीन बोगद्यात किमी 39 येथे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास तीन वाहनांचा अपघात झाला. यामध्ये एका टँकर चालकाचा मृत्यू झाला आहे.
ट्रेलर क्रमांक (MH 43 CE 3217) गॅस टँकर क्रमांक (MH 04 HD 9198) आणि कार वाहतूक करणारा कंटेनर क्रमांक (NL 01 AD 3146) ही तीनही बोगद्यात वाहने एकमेकास धडकली. ट्रेलर व कार वाहू कंटेनर या दोघांच्या मध्ये सापडलेल्या टँकर चालक अक्षय वेंकटराव ढेले (वय 30, अहमदपूर, लातूर) याचा केबिनमध्ये आडकल्याने मृत्यू झाला. अपघातानंतर कार कंटेनर वरील चालक पळून गेला आहे. आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल यांनी या अपघातात मदत कार्य केले. या अपघाताचा पुढील तपास खोपोली पोलीस करत आहेत.