Breaking news

Lonavala News l राज्य नेमबाजी स्पर्धेत लोणावळ्यातील रायफल अँड पिस्तूल अकादमीचे यश

लोणावळा : मुंबई वरळी येथे 7 ते 9 जून दरम्यान पार पडलेल्या कॅप्टन इझिकल महाराष्ट्र राज्य नेमबाजी स्पर्धेत लोणावळ्यातील रायफल अँड पिस्तूल अकादमीच्या खेळाडूंनी यश प्राप्त केले आहे.

   50 मीटर प्रोन (सिनियर) गटामध्ये : संतोष तळेकर याने 600 पैकी 561 गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला. 50 मीटर थ्री प्रोशिशन प्रकारामध्ये 600 पैकी 519 गुण मिळवत ऋतुजा गवळी हिने ज्युनियर गटात एक रौप्य व सिनियर गटात एक रौप्य पदक मिळविले. 50 मीटर फ्री पिस्तूल प्रकारात नमिता दशरथ पाटील हिने 300 पैकी 230 गुण मिळवत सुवर्ण पदक मिळविले. 10 मीटर एअर रायफल प्रकारात 400 पैकी 376 गुण मिळवत अनन्या सचिन तळेकर व 400 पैकी 349 गुण मिळवत अमृता गणेश कडू हिने यश प्राप्त केले आहे. 

    या सर्व खेळाडूंची निवड जुलै महिन्यात होणाऱ्या वेस्ट झोन स्पर्धेसाठी झाली आहे. सर्व खेळाडू लोणावळ्यातील रायफल अँड पिस्तूल अकादमीचे स्नेहल दाभाडे व राज दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत.

इतर बातम्या