Breaking news

Karla News : समर्थ शलाका शिष्यवृती परिक्षेत श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला शाळेची दमदार कामगीरी

कार्ला (प्रतिनिधी) : तळेगाव येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ व कै. ॲड. शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या समर्थ शलाका शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेत आर्या गणेश आहिरे हिने प्रथम क्रमांक, कु स्नेहल विठ्ठल शिंदे हिने द्वितीय क्रमांक, कु पल्लवी संतोष ढमाले हिने तृतीय क्रमांक तर उत्तेजनार्थ शिष्यवृती मध्ये कु अक्षरा संजय गरुड या चार विद्यार्थीनींनी टाॅप फाईव्ह मध्ये स्थान मिळविले. तर अकरावी मध्ये दिक्षा अबाजी तुपे या विद्यार्थ्यींनीने यश मिळवत श्री एकविरा विद्या मंदिर शाळेचा यावर्षी देखील डंका कायम ठेवला. 

     या विद्यार्थ्यांना एन.एम.एम.एस परीक्षा व शिष्यवृती परीक्षेत यशस्वी विद्यार्थी घडवणारे शिक्षक उमेश इंगुळकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. एन.एम.एम.एस तसेच आठवी शिष्यवृती परिक्षेप्रमाणे समर्थ शलाका परीक्षेत देखील गेल्या अनेक वर्षांपासून एकविरा विद्यालयातील विद्यार्थ्यांचा बोलबाला कायम राहिला आहे. 

       विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेचा सराव व्हावा, परीक्षेची भीती दूर व्हावी, प्रोत्साहन मिळावे, शाळांच्या गुणवत्तेचा दर्जा सुधारावा, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची संधी मिळावी या उद्देशांने समर्थ शलाका शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्याचे संतोष खांडगे यांनी सांगितले. इयत्ता सातवी,अकरावी व  नववीतील एकूण 1350 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस बसले होते. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष संजय भेगडे, सचिव संतोष खांडगे, शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे, प्राचार्य संजय वंजारे, माजी सभापती शरद हुलावळे, माजी पं समिती सदस्य दिपक हुलावळे, सरपंच दिपाली हुलावळे, उपसरपंच किरण हुलावळे यांंच्यासह ग्रामपंचायत सदस्य व कार्ला ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

इतर बातम्या