Breaking news

सामाजिक वनीकरण विभागाचा “चला जाणूया वनाला” कार्यक्रम सिंहगड पब्लिक स्कूल मध्ये संपन्न

लोणावळा : सामाजिक वनीकरण विभाग पुणे परीक्षेत्र वडगाव मावळ आयोजित "चला जाणूया वनाला" हा कार्यक्रम आज मंगळवारी (26 मार्च) सिंहगड पब्लिक स्कूल कुसगाव बुद्रुक या ठिकाणी संपन्न झाला.

    या कार्यक्रमांतर्गत सिंहगड पब्लिक स्कूल कुसगाव बुद्रुक लोणावळा येथील विद्यालयाने लोहगड येथे राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांसाठी नैसर्गिक सहलीचे आयोजन केले होते. या नैसर्गिक सहली अंतर्गत वनाभ्यास, वनसंरक्षण व अनुभव, पक्षी, प्राणी व वनऔषधी यांची माहिती, वन व्यवस्थापन व मानव वन्यजीव संघर्ष याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. 

      विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सापांची माहिती देखील यावेळी देण्यात आली. याकरिता सर्पमित्र जिगर सोळंकी, श्रीकृष्ण नथू शेळके व सागर गावडे यांनी मार्गदर्शन केले. पक्षी व वनौषधी वृक्षांसंदर्भात शिवाजी गाडे यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. या उपक्रमाकरिता वनपाल भाऊसाहेब बुरुंगले व श्रीमती तनुजा शेलार वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण परीक्षेत्र वडगाव मावळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे प्राचार्य निर्मल कुमार मिश्रा यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना निसर्गा विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न केल्याबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक व अभिनंदनही  केले.

इतर बातम्या