Breaking news

लोणावळा येथील सिंहगड इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थिनीची प्लेसमेंट मधून NVDIA मध्ये निवड; 9 लाख वार्षिक पॅकेज

लोणावळा : सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SIT), लोणावळा येथील संगणकशास्त्र (CS) विभागातील विद्यार्थिनी तनिष्का सुहास पांढरपट्टे हिची NVIDIA या जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान कंपनीमध्ये निवड झाली असून तिला ₹९ लाख वार्षिक CTC प्राप्त झाले आहे. ती २०२७ बॅचची विद्यार्थिनी आहे.

NVIDIA ही कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), संगणकीय तंत्रज्ञान, ग्राफिक्स प्रोसेसिंग आणि उच्च कार्यक्षम संगणनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेली आघाडीची तंत्रज्ञान कंपनी आहे. AI आणि आधुनिक संगणकीय तंत्रज्ञानाच्या विकासात कंपनीचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

तनिष्काच्या या उल्लेखनीय यशामागे तिची तांत्रिक कौशल्ये, सातत्यपूर्ण मेहनत, अभ्यासातील प्रगती आणि करिअरविषयीची जिद्द महत्त्वाची ठरली. प्रतिष्ठित तंत्रज्ञान कंपनीमध्ये झालेली तिची निवड ही SIT लोणावळ्यासाठी अभिमानाची बाब असून, इतर विद्यार्थ्यांसाठीही ती प्रेरणादायी ठरली आहे.

तनिष्का पांढरपट्टे हिच्या या यशाबद्दल सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले, संस्थापक सचिव डॉ. सुनंदा नवले, उपाध्यक्ष डॉ. रोहित नवले आणि उपाध्यक्ष डॉ. रचना नवले-अष्टेकर यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचे कौतुक करण्यात आले.

या यशाबद्दल लोणावळा कॅम्पसचे संचालक डॉ. राजेंद्र लोखंडे, प्राचार्य डॉ. डी. एस. मंत्री, उपप्राचार्य डॉ. एस. एम. गायकवाड, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रमुख प्रा. मयूर राऊत व कर्मचारी यांनी तनिष्का पांढरपट्टे हिचे अभिनंदन करून तीच्या उज्ज्वल आणि यशस्वी व्यावसायिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

इतर बातम्या