Breaking news

प्रशासन करतंय काय ? लोणावळ्यात मतदान केंद्र परिसरात वाहतूक कोंडी; रस्त्याच्या कामामुळे मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यास होतोय अडथळा

लोणावळा : लोणावळा शहरातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे मतदान केंद्र हे ऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूल येथे ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी हे पीएमआरडीच्या माध्यमातून रस्ता बनवण्याचे काम सुरू आहे व आज मतदानाच्या दिवशी देखील सदरचे काम सुरू राहिल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मतदान केंद्र असणाऱ्या भागातील आठवडे बाजार शासनाने बंद केला मात्र ज्या मतदान केंद्राच्या बाहेरून रस्ता जात आहे त्या रस्त्याचे काम सुरूच ठेवल्यामुळे मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी वाहतूक कोंडी व अडथळ्याचा सामना करावा लागतो आहे.

या ठिकाणी पीएमआरडीए असेल लोणावळा पोलीस असतील यापैकी कोणीही आपले कर्मचारी नियुक्त न केल्यामुळे या वाहतूक कोंडीचा सामना मतदान केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक मतदाराला सहन करावा लागतो आहे. शासनाने या गंभीर समस्येची दखल घेत तातडीने तिचे सोडवणूक करणे गरजेचे असल्याची भावना मतदार व्यक्त करत आहेत.

इतर बातम्या