Breaking news

Karla News : पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधी शेतकरी आंदोलनाला श्री एकविरा देवी कृती समितीचा जाहीर पाठिंबा

लोणावळा : पवना बंदिस्त जलवाहिनीवरील स्थगिती उठविण्यात आल्याने मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला असून या जलवाहिनी विरोधातील शेतकरी आंदोलनाला कार्ला पंचक्रोशीतील श्री एकविरा देवी कृती समितीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.

      पवना धरणातून पाईपलाईनद्वारे जे पाणी पिंपरी चिंचवड शहराला शासन नेणार आहे. त्यामुळे मावळातील 272 गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई होईल व तळेगाव देहूरोड शहरांना पाणी मिळणार नाही. तसेच 22 गावांना बागायती क्षेत्र करता येणार नाही. त्यामुळे या बंद पाईपलाइनमुळे मावळ तालुका पाण्यापासून उपेक्षित राहील. यापूर्वी झालेल्या आंदोलनामध्ये शेतक-यांचे 3 बळी गेले व पाचशे शेतक-यांवरती गुन्हे दाखल झाले. याचाच अर्थ शेतक-यांचा या पाईप लाईनला तिव्र विरोध आहे. याचे भान शासनाने ठेवावे व निर्णय मागे घ्यावा.

    श्री एकविरा कृती समितीचे भाई भरत मोरे म्हणाले, एकविरा कृती समीतीच्या वतीने आम्ही शासनाच्या निदर्शणास आणू इच्छितो की, मावळ तालुक्यातील ठोकळवाडी, सोमवडी, शिरवता, वलवण, लोणावळा या टाटा कंपनीच्या धरणाचा सुमारे 23 टी.म.सी. जल साठा आहे. सदर जल साठा विज निर्माण केल्यानंतर हे सर्व पाणी समुद्रात जाते. या पाण्याचा उपयोग कर्जत शहर व खोपोली शहर सोडले तर कर्जत, खालापुर मध्ये केला जात नाही. जर हे पाणी खोपोली व भिवपुरी विज निर्माण केल्यानंतर उचलून पाईप लाईनद्वारे इंद्रायणी नदीत पुन्हा सोडल्यास पिंपरी चिंचवड, पुणे, सोलापूर भागाचा पाण्याचा प्रश्न सुटेल. याला दोन पर्याय आहेत. 1) वलवण धरणावर जर हायड्रो प्रकल्प केला तर विज निर्माण झाल्या नंतर हे पाणी इंद्रायणीत सोडले जाईल, 2) ठोकळवाडी धरण वडेश्वर येथे हायड्रो प्रकल्प केल्यानंतर हे पाणी आंद्रा नदीमार्गे इंद्रायणीत सोडता येईल. 3) खोपोली येथे विज निर्माण केल्यानंतर हे पाणी लिप्ट करून इंद्रायणीत सोडता येईल. 

इतर बातम्या