Breaking news

Maval Loksabha : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे यांची उमेदवारी जाहीर

लोणावळा : महाविकास आघाडी मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज महाराष्ट्रामधील 17 लोकसभा जागेवरील उमेदवार घोषित करण्यात आले. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी संजोग वाघेरे यांची उमेदवारी आज अधिकृतरित्या घोषित करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही यादी घोषित केली.

     शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व काँग्रेस पक्ष यांची मिळून महाविकास आघाडी आहे. लोकसभा जागा वाटपामध्ये मावळ लोकसभेची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाट्याला आली आहे. मागील दोन तीन महिन्यापूर्वी राष्ट्रवादी मधून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले माजी महापौर संजोग वाघेरे यांची उमेदवारी जवळपास निश्चित समजली जात होती मात्र अधिकृतपणे घोषणा झालेली नव्हती. आज मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून वाघेरे यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे. संजोग वाघिरे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर आहेत. 

        मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये पुणे जिल्ह्यामधील चिंचवड, पिंपरी व मावळ तर रायगड जिल्ह्यामधील कर्जत, उरण व पनवेल असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. या लोकसभा मतदारसंघांमधील मतदार संख्या ही जवळपास 25 लाख आहे. भौगोलिक दृष्ट्या अतिशय मोठा असा हा मतदारसंघ असून घाटाखालील तीन व घाटावरील तीन असे सहा मतदारसंघ यामध्ये येत असल्याने प्रचार करताना महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही उमेदवारांची व कार्यकर्त्यांची दमछाक होणार आहे. मावळ लोकसभेसाठी 13 मे रोजी मतदान होणार असल्याने प्रचारासाठी एप्रिल व मे महिना मिळणार आहे. सध्या प्रचंड उष्णता वातावरणामध्ये वाढलेली आहे या रखरखत्या उन्हामध्ये उमेदवारांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रचार करावा लागणार आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून 17 नावं जाहीर


1) नरेंद्र खेडकर-बुलढाणा


2) संजय देशमुख-यवतमाळ-वाशिम


3) संजोग वाघेरे पाटील-मावळ


4) चंद्रहार पाटील-सांगली


5) नागेश आष्टिकर-हिंगोली


6) चंद्रकांत खैरे-छत्रपती संभाजी नगर


7) ओमराजे निंबाळकर-धाराशिव


8) भाऊसाहेब वाघचौरे-शिर्डी


9) राजाभाऊ वाजे-नाशिक


10) अनंत गीते-रायगड


11) विनायक राऊत-सिंधुदुर्ग, रत्नागिरी


12) राजन विचारे-ठाणे


13) अनिल देसाई - मुंबई दक्षिण मध्य


14) संजय दिना पाटील-मुंबई ईशान्य


15) अरविंद सावंत-मुंबई दक्षिण


16) अमोल किर्तीकर-मुंबई वायव्य


17) संजय जाधव-परभणी

इतर बातम्या