Breaking news

सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SIT), लोणावळा येथील विद्यार्थ्यांची विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये निवड

लोणावळा : सिंहगड इन्स्टिट्यूट्स, लोणावळा कॅम्पसच्या Training and Placement Cell च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. याचाच एक भाग म्हणून सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SIT), लोणावळा येथील बॅच 2026 मधील चार विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.

     मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागातील श्रेया खोब्रागडे हिची Orcatech मध्ये ₹3.40 लाख वार्षिक CTC वर निवड झाली. E&TC विभागातील विभा नंदू जोशी हिची Drihten Technology मध्ये ₹2.04 लाख CTC वर निवड झाली. तसेच इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागातील प्रतीक राजेंद्र काळे याची Trimurti Stai Link Equipment Pvt. Ltd. मध्ये ₹3.31 लाख CTC वर, तर याच विभागातील योगेश संतोष आव्हाड याची Chandra Electrical and Electronics मध्ये ₹3.00 लाख वार्षिक CTC वर निवड झाली.

या विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक गुणवत्ता, तांत्रिक कौशल्य, मेहनत आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर हे यश संपादन केले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे SIT लोणावळ्याच्या प्लेसमेंटच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

      या यशाचे श्रेय सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले, संस्थापक सचिव डॉ. सुनंदा नवले, उपाध्यक्ष डॉ. रोहित नवले आणि उपाध्यक्ष डॉ. रचना नवले-अष्टेकर यांच्या दूरदर्शी नेतृत्वाला देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल लोणावळा संकुलाचे संचालक डॉ. राजेंद्र लोखंडे, प्रभारी प्राचार्य डॉ. डी. एस. मंत्री, उपप्राचार्य डॉ. एस. एम. गायकवाड, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. मयूर राऊत, शिक्षकेतर कर्मचारी, Training and Placement Cell तसेच पालकांनी चारही विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांच्या मेहनतीचे कौतुक करत सर्वांनी विद्यार्थ्यांना पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी उज्ज्वल आणि यशस्वी भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

इतर बातम्या