सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्याची हुंडाई मोटर इंडिया मध्ये निवड; वार्षिक 4 लाख 60 हजाराचे पॅकेज
लोणावळा : सिंहगड इन्स्टिट्यूट्स, लोणावळा कॅम्पसच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना उद्योगविश्वातील उत्कृष्ट संधी उपलब्ध होत आहेत. या पार्श्वभूमीवर सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SIT), लोणावळा येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (E&TC) विभागातील तृतीय वर्ष मधील विद्यार्थी शिवम शेंडे याची हुंडाई मोटर इंडिया (Hyundai Motor India) मध्ये 4.60 लाख वार्षिक वेतन पॅकेज (CTC) वर निवड झाली आहे.
अभियांत्रिकी शिक्षण घेत असतानाच तृतीय वर्षात मिळविलेले हे यश विद्यार्थ्याच्या गुणवत्ता, मेहनत आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे द्योतक आहे. तसेच संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलकडून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या उद्योगाभिमुख प्रशिक्षणाचे हे फलित मानले जात आहे.
Hyundai Motor India ही भारतातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी असून प्रवासी वाहनांच्या निर्मिती, संशोधन, गुणवत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट उत्पादनक्षमतेमुळे कंपनी भारतीय ऑटोमोबाईल उद्योगात महत्त्वाचे स्थान राखून आहे.
या यशाचे श्रेय संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले, संस्थापक सचिव डॉ. सुनंदा नवले, उपाध्यक्ष डॉ. रोहित नवले आणि उपाध्यक्ष डॉ. रचना नवले अष्टेकर यांच्या दूरदर्शी नेतृत्वाला देण्यात आले. त्यांच्या विद्यार्थी-केंद्रित धोरणांमुळे शैक्षणिक गुणवत्ता आणि रोजगाराच्या संधी सातत्याने वाढत आहेत. तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. मयूर राऊत यांचे मार्गदर्शनही मोलाचे ठरले. विद्यार्थ्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सिंहगड लोणावळा संकुलाचे संचालक डॉ. शिवाजी देसाई, प्रभारी प्राचार्य डॉ. डी. एस. मंत्री, उपप्राचार्य एस एम गायकवाड तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी त्यांनी त्याच्या मेहनतीचे कौतुक करत त्याला उज्ज्वल व यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.






















