Breaking news

सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती काशीबाई नवले शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा 100% निकाल

लोणावळा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या वार्षिक परीक्षेत सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती काशीबाई नवले शिक्षणशास्त्र महाविद्यालय, लोणावळा येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाचा 100% निकाल लागण्याची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे.

      यंदाच्या परीक्षेत द्वितीय वर्षातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेचे प्रदर्शन केले. त्यामध्ये शिखा सिंह (80.85%), खैर मनाली साईनाथ (80.15%), मिनेझीस अमिसा पक्विता (80.05%), शेख महेराम मेहबूब (79.95%) आणि चव्हाण स्नेहल संदीप (79.75%) यांनी विशेष प्राविण्य मिळवत महाविद्यालयाच्या यशात मोलाचा वाटा उचलला.

        या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. देसाई यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे तसेच अध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. "विद्यार्थ्यांचे हे यश त्यांच्या अथक परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या सहकार्याचे फलित आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांनी याच जिद्दीने यशाची परंपरा कायम ठेवावी," असे त्यांनी सांगितले.

       निकाल जाहीर होताच महाविद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांनी भविष्यातही उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करत महाविद्यालयाचे नाव अधिक उंचावण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

इतर बातम्या