Breaking news

लोणावळा शहरात पावसाचा जोर वाढला; सोमवारी दिवसभर पाऊस - आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा सज्ज

लोणावळा : मागील काही दिवसापासून विसावलेल्या पावसाचा जोर लोणावळा शहरामध्ये पुन्हा वाढला आहे. सोमवारी 20 जुलै रोजी लोणावळा शहरात दिवसभर जोरदार पाऊस झाला. मागील तीन ते चार दिवसापासून लोणावळा शहरामध्ये पाऊस सुरू आहे. आज मात्र पावसाच्या प्रमाणात चांगलीच वाढत झाली होती. 

      मागील आठवड्यामध्ये पाच सहा व सात जुलै रोजी लोणावळा शहरामध्ये मुसळधार पाऊस झाला होता. या मुसळधार पावसामुळे लोणावळा शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन संपूर्ण शहराचे जनजीवन विस्कळीत झाले होते. दोन हजारापेक्षा अधिक नागरिक या आपत्तीमध्ये नुकसानग्रस्त झाले आहेत. लोणावळा शहरात पुन्हा पावसाचा जोर वाढल्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला व टाटा कंपनीला आत्तापासूनच पाहण्याचे योग्य प्रकारे नियोजन करा अशा सूचना दिल्या आहेत. तसेच लोणावळ्याच्या मान्सून लेख मध्ये दैनंदिन जमा होणाऱ्या व डकलाईन मार्गे सोडल्या जाणाऱ्या पाण्याची आकडेवारी टाटा कंपनीने सार्वजनिक करावी जेणेकरून नागरिकांना देखील धरणांमधील पाण्याचा अंदाज येईल अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

     लोणावळा शहरामध्ये सुरू असलेल्या पावसासोबतच वारा देखील जोरात वाहत आहे. शहराचा जो भाग सकल आहे जे रस्ते कायम पाण्याखाली जातात अशा रस्त्यांवर या पावसामुळे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पाणी साचण्याचे प्रमाण सध्या तरी अल्प असले तरी पावसाचा जोर वाढल्यास त्यामध्ये वाढ होऊ शकते. घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जोरदार पावसामुळे लोणावळा शहरामध्ये पुन्हा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास या परिस्थितीचा सामना करण्यासाठी लोणावळा नगरपरिषद व शिवदुर्ग संस्था सज्ज झाले असून चार बोटी तयार ठेवण्यात आल्या आहेत.

इतर बातम्या