Breaking news

Lonavala Rural Police : गणेशउत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर कार्ला परिसरात पोलिसांचा रुटमार्च

कार्ला : आगामी गणेश उत्सव व ईद च्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी कार्ला गाव परिसरामध्ये लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून रूट मार्च करत उत्सव काळामध्ये गावात शांतता कायम ठेवण्याबाबत सूचना करण्यात आल्या.

     कार्ला फाटा, खालची आळी, मधली आळी, मारुती मंदिर चौक आदी परिसरात सशस्त्र 'रुट मार्च' (पोलिस संचलन) करण्यात आले. लोणावळा विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांंच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सिताराम डुबल, रविंद्र पाटील, कुमार  कदम, सहायक पोलीस निरीक्षक किशोर शेवते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, नितेश कवडे, गणेश होळकर, विनोद गवळी पोलीस पाटील संजय जाधव यांच्यासह 60 पोलीस कर्मचारी, आर सी पी पथक व  स्ट्रायकिंग पथक तसेच 20 होमगार्ड या रुट मार्चमध्ये सहभागी होते. 

    मंगळवार पासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवाच्या काळात तसेच ईद ए मिलाद या काळात कायदा व  सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही तसेच सर्व उत्सव शांतंतेत पार पाडावा यासाठी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने या रुट मार्चचे आयोजन केले होते.

इतर बातम्या