Lonavala News l व्हीपीएस शाळेत विद्यार्थी सुरक्षा या विषयावर पालक सभा संपन्न
लोणावळा : येथील विद्या प्रसारिणी सभेच्या व्हीपीएस प्राथमिक विद्यालय लोणावळा येथे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षा विषय उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात विद्यार्थी सुरक्षा या विषयावरती पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. पालक सभेच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका मंगल जाधव उपस्थित होत्या.
सदर सभेस मार्गदर्शन करण्यासाठी लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपाली पाटील यांनी पालकांना समुपदेशन केले. समाजामध्ये घडणाऱ्या विविध घटना आणि त्याचे परिणाम याची माहिती पालकांना देण्यात आली. विद्यार्थ्यांची काळजी कशाप्रकारे घ्यावी याची माहिती पाटील मॅडम यांनी पालकांना समजून सांगितली. शाळेत सीसीटिव्ही, तक्रार पेटी, विद्यार्थी सुरक्षा समिती असावी अशा सूचना केल्या. विद्यार्थी हसत खेळत शाळेत कशाप्रकारे आला पाहिजे याचे उत्तम उदाहरण त्यांनी पालकांना समजून सांगितले. शेवटी पालकांना बोलते करून पालकांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या. पालकांनी आपले मत व्यक्त केले.
सदर पालक सभा संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मृणालीनी गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी, संस्थेचे सहकार्यवाह विजय भुरके यांच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्ही.पी.एस हायस्कूलचे प्राचार्य उदय महेंद्रकर उपस्थित होते. शिक्षक हनुमंत शिंदे, शिक्षिका मनीषा जरग, सुनीता वरे व पालक सभेस उपस्थित होते. पालक सभेचे प्रस्ताविक मुख्यध्यापिका मंगल जाधव यांनी केले तर सूत्रसंचलन प्रकाश पाटील यांनी केले. संजय भालचिम यांनी सर्वांचे आभार मानले.