श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय भाजे मळवली येथे चित्रकला स्पर्धा संपन्न

लोणावळा : शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने मा. पंतप्रधानांच्या परीक्षा पे चर्चा पर्व - 6 या उपक्रमांतर्गत माध्यमिक स्तरावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
स्पर्धेसाठी आझादी का अमृतमहोत्सव, कोरोना लसीकरणात भारत नंबर एक, स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ - बेटी पढाओ, आंतरराष्ट्रीय योग दिनहे विषय देण्यात आले होते. प्राचार्या वर्षा क्षीरसागर, पर्यवेक्षक मकरंद गुर्जर, शिक्षक परमेश्वर खाटपे, चित्रकला शिक्षक देवकाते सर, कवडे सर, शिक्षिका दीपाली गायकवाड, शामल तिकोने, रुपाली खैरे इत्यादी शिक्षकवृंद यावेळी उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मच्छिंद्र केदारी, हभप दिलीप महाराज खेंगरे, भाजपा गण अध्यक्ष शेखर दळवी, भाजपा कामगार आघाडी अध्यक्ष अमोल भेगडे उपस्थित होते.