Breaking news

कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्रात 16 जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

लोणावळा : कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्रात 16 जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्व. किशोर दत्तात्रय जाधव यांच्या पुण्यस्मरणानिमित्त या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत ही शिबिर होणार आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या पुरुष रक्तदात्यास हेल्मेट व महिला रक्तदात्यास गरम पाण्याची इलेक्ट्रिक पिशवी भेट दिली जाणार असल्याची माहिती आयोजक दिनेश जाधव यांनी दिली. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांना या शिबिरात सहभागी होत रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


इतर बातम्या

दरड कोसळलेल्या पाटण गावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; दरड पडण्याच्या धोक्याने नागरिकांना गाव खाली करायला लावले मात्र प्रशासनाकडून कोणतीही व्यवस्था झाली नाही - नागरिकांचा आरोप