Breaking news

Educational News l सातत्यपूर्ण अभ्यास, आत्मविश्वास आणि शिस्त याची सांगड घातली तर यश निश्चित मिळते - संतोष खांडगे

तळेगाव दाभाडे : सातत्यपूर्ण अभ्यास, आत्मविश्वास आणि शिस्त याची सांगड घालत विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करत समाजासाठी आदर्श निर्माण करावा असे मत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी व्यक्त केले. तळेगाव दाभाडे येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ, कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील ७० शाळांतील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी खांडगे अध्यक्षस्थानी बोलत होते.

यावेळी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या सभापती भारती धोत्रे, रोटरी ३१३१ चे माजी उपप्रांतपाल अशोक शिंदे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पुणे विभागाचे कार्याध्यक्ष अमित कुलकर्णी, गुलाबराव गवळे, कोषाध्यक्ष महेश शेलार, पुणे जिल्हा अध्यक्ष निलेश काशिद, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, माजी अध्यक्ष विन्सेंट सालेर, मिलिंद शेलार, शिक्षक परिषद मावळचे अध्यक्ष राम कदमबांडे, कार्यवाह देवराम पारीठे, कार्याध्यक्ष अशोक कराड, रोटरीचे सचिव संदिप मगर खजिनदार लक्ष्मण मखर, परिषदेचे जिल्हा कोषाध्यक्ष भाऊसाहेब खोसे, कार्याध्यक्ष राजेंद्र भांड,संघटक धनकुमार शिंदे यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक अनेक मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी पुढे बोलताना खांडगे म्हणाले की, शैक्षणिक गुणवत्ता आणि उत्तम संस्कार यांची सांगड घातली तर यश निश्चित मिळते. विद्यार्थ्यांनी ज्ञानाबरोबरच चारित्र्य, सामाजिक बांधिलकी आणि मूल्यांची जपणूक करत यशाची ही परंपरा पुढे नेली पाहिजे. शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष अमित कुलकर्णी म्हणाले, जीवनात यश आणि अपयश दोन्हींचे समतोलपणे स्वागत करा. समाजातून खूप काही शिकता येते. साधेपणातच खरी शिस्त आणि संस्कार दडलेले असतात. गुणवत्तेबरोबरच खेळ, वक्तृत्व, सांस्कृतिक उपक्रम आणि माणसे जोडण्याची कला आत्मसात करा.

उपप्रांतपाल शिंदे म्हणाले, मोठी स्वप्ने पाहा, आव्हानांना सामोरे जा, प्रत्येक संधीचा उपयोग करा, अनुभवातून शिका, प्रश्न विचारण्याची सवय लावा आणि विविध क्षेत्रांची माहिती मिळवा. करिअर हा केवळ व्यवसाय नसून आयुष्य आनंदाने जगण्याचा मार्ग आहे. मान्यवरांच्या या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

यावेळी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष राम कदमबांडे यांनी केले. सुत्रसंचालन संभाजी बोराडे व भारत काळे यांनी केले तर आभार लक्ष्मण मखर यांनी मानले.


इतर बातम्या

दरड कोसळलेल्या पाटण गावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; दरड पडण्याच्या धोक्याने नागरिकांना गाव खाली करायला लावले मात्र प्रशासनाकडून कोणतीही व्यवस्था झाली नाही - नागरिकांचा आरोप