मावळ तालुक्यातील ताजे गावात डोंगराचा काही भाग निसटला; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
लोणावळा : मावळ तालुक्यातील ताजे गावात मुसळधार पावसामुळे डोंगराचा काही भाग अचानक निसटल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासन, पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांना धोकादायक भागापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, सततच्या पावसामुळे डोंगराचा काही भाग घसरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेचा पंचनामा व पुढील तपास सुरू असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






















