Breaking news

Maval News : मावळात जिल्हास्तरीय विषय शिक्षक या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

तळेगाव दाभाडे : पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ पुणे आणि डी वाय पाटील युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय विषय शिक्षक दोन दिवसाची कार्यशाळा दि. 5 व 6 जून रोजी होणार असल्याची माहिती मुख्य संयोजक तथा पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राजेश गायकवाड यांनी दिली.

 यामध्ये प्रथम सत्र उद्घाटन शिक्षणाधिकारी माध्यमिक पुणे जिल्हा परिषद सुनंदा वाखारे (ठुबे) यांच्या अध्यक्षतेखाली व वाईस चान्सलर ( डी वाय पाटील युनिव्हर्सिटी डॉ. सायली गणकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई सचिव शांताराम पोखरकर, मा. अध्यक्ष अरुण थोरात, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ मा. अध्यक्ष शिवाजीराव किलकिले, मा. अध्यक्ष हनुमंत कुंबडे मा. सचिव आदिनाथ थोरात, मावळ तालुका मुख्याध्यापक संघ विश्वस्त बी.एम.भसे आदी उपस्थित रहाणार आहेत. तर मा. उपशिक्षणाधिकारी कृष्णकांत चौधरी हे सेवा जेष्ठता व मूल्यांकन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ प्रवक्ते महेंद्र गणपुले हे नवीन शैक्षणिक धोरण व प्रश्नपत्रिका आराखडा या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

दुस-या दिवशी 6 जून रोजी सकाळी एकविरा देवी गड ट्रेक, दर्शन व कार्ला लेणी सहल, सर्व विषयांची प्रश्नपत्रिका आराखडा व तज्ञ मार्गदर्शन व गटचर्चा होणार. त्यानंतर उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद निलेश धानापुणे, प्रणिता कुमावत (नाईक), सचिन लोखंडे, मावळ पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ सदस्य कुंडलिक मेमाणे, चंद्रकांत मोहोळ, हरिश्चंद्र गायकवाड उपस्थित रहाणार आहेत.. या कार्यक्रमा करीता डाॅ. विजय पाटील अध्यक्ष आणि कुलपती डी वाय पाटील युनिवर्सिटी हे मार्गदर्शन करणार आहेत.

    या कार्यशाळेचे नियोजन प्रसाद गायकवाड, मधुकर नाईक, नंदकुमार सागर, भानुदास रिठे, ताबाजी वागदरे, विकास तारे, विठ्ठल माळशिकारे, प्रा.चेतन मोरे, मुख्य संयोजक राजेश गायकवाड व मावळ तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ पदाधिकारी यांनी केले आहे.

 

इतर बातम्या