Breaking news

शिवसम्राट प्रतिष्ठान अजिवली यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन; 64 रक्तबॅगचे संकलन

वडगाव मावळ : शिवसम्राट प्रतिष्ठान अजीवली यांचा नववा वर्धापनदिन व कार्याध्यक्ष कैलासवासी भाऊ नंतू लायगुडे  यांच्या स्मरणार्थ अजिवली मावळ येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

     कार्यक्रमाचे उद्घाटन मावळचे लोकप्रिय आमदार सुनील आण्णा शेळके यांचे बंधू उद्योजक सुधाकर शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. सलग नऊ वर्ष अजीवली गावातील तरुण रक्तदानाचा उपक्रम राबवत असल्यामुळे मावळ तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षातील मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली. अत्यंत छोट्या आणि ग्रामीण भागात असणाऱ्या या गावातील 64 रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. उद्योजक सुधाकर शेळके यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून स्वतः देखील रक्तदान केले. 

    अजीवली गावात होत असलेल्या या उपक्रमाबाबत बोलताना सुधाकर शेळके म्हणाले ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यासाठी महिला आणि पुरुष एकत्र येत आहेत याचा सार्थ आनंद होतो. या गावाचा आदर्श आपल्या तालुक्यातील इतर गावांनी देखील घेतला पाहिजे. रक्तदानासाठी तरुणांनी उभी केलेली ही चळवळ अत्यंत मोलाची आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. अजीवली गावातील हा उपक्रम अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याने पुढील काळात आरोग्यविषयक या गावातील कोणती समस्या असल्यास संपूर्ण गावाचे आरोग्य तपासण्या करण्यासाठी गाव जो वेळ देईल त्या वेळेत आम्ही तपासण्या मोफत करून घेऊ असे सुधाकर शेळके यांनी यावेळी आश्वासन दिले. या कार्यक्रमासाठी पीएसआय, रक्तपेढी पिंपरीरी चिंचवड यांचे अमूल्य सहकार्य लाभले.

     यावेळी माजी सभापती निकिता घोटकुले, मावळ तालुका मनसे अध्यक्ष रुपेश म्हाळस्कर, सभापती नंदकुमार धनवे, संभाजी राक्षे, नरेंद्र ठाकर, संतोष  कडू, माजी सरपंच सचिन शिंदे, ज्ञानेश्वर डफळ, रामदास गोणते, चेअरमन सचिन संभाजी शिंदे, नवनाथ गोणते, धोंडूभाऊ जाधव, अंकुश लायगुडे, उपसरपंच छाया गोणते, रुपाली लायगुडे, मुक्ताबाई थोरवे, पोलीस पाटील रुपाली लायगुडे, रोशना गोणते, कल्पना लायगुडे, अनंता महाराज लायगुडे, तानाजी लायगुडे, रवी लायगुडे, गणेश पाटील, काझी सर, सुनील केंडे, संभाजी केंडे, दत्ता गोणते, राजू लायगुडे अनिल लायगुडे, महेश लायगुडे, किसन लायगुडे, संभाजी लायगुडे, संतोष लायगुडे, देविदास लायगुडे, मनोज शिंदे, शेखर लायगुडे, निखिल लायगुडे,नारायण केंडे, भरत ओव्हाळ, बबाबाई लायगुडे, बबन शिंदे, पांडुरंग उंबरकर, संतोष केंडे, आनंता केंडे, मधुकर केदारी, शत्रुघ्न लायगुडे, सचिन लायगुडे, रमेश मोरे, रवींद्र उंबरकर, विशाल ओव्हाळ, रोहिदास लायगुडे, नितीन लायगुडे, उत्तम लायगुडे, शंकर जाधव व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी लायगुडे यांनी केले तर आभार अनंता लायगुडे यांनी मानले.

इतर बातम्या