इंदोरीच्या मीनल जगताप यांना दिशा स्वास्थ्य उपक्रमांतर्गत मेडिक्लेम; महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी दिशा संस्थेचा उपयुक्त उपक्रम

तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी - अरूणा पवार) : दिशा महिला बचत गट सदस्यांची सहकारी पतसंस्था, तळेगाव दाभाडे ही संस्था 2014 पासून महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी कार्यरत आहे. 2014 ते मार्च 2023 या कालावधीत ही संस्था एसएचजी मॉडेल अंतर्गत कार्यरत होती. मात्र, 2023-24 पासून संस्थेने जॉइंट लायबिलिटी ग्रुप (JLG) या नव्या पद्धतीने काम करण्यास सुरुवात केली आहे.
याच कालावधीत, 2023-24, 2024-25 आणि पुढील काळात दिशा संस्था "दिशा स्वास्थ्य" या उपक्रमांतर्गत महिलांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आरोग्य विषयक सहाय्य देण्यासाठी कार्यरत आहे. या योजने अंतर्गत कर्जदार महिला सभासदांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आरोग्य निधीच्या माध्यमातून क्लेम देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत दिनांक 5 मे 2025 रोजी इंदोरी येथील मीनल गणेश जगताप यांना मेडिक्लेम दिशा संस्थेच्या सचिव वासंती ताटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी संस्थेच्या व्यवस्थापिका अरुणा पवार, मीनल यांचे पती गणेश जगताप, त्यांच्या सासूबाई आणि बचत गटाच्या सदस्य महिला उपस्थित होत्या. दिशा संस्थेचा हा उपक्रम महिलांच्या आणि त्यांच्या कुटुंबांच्या आर्थिक व आरोग्य सुरक्षेसाठी निश्चितच उपयुक्त व प्रेरणादायक ठरत आहे