Breaking news

Lonavala Rain Information l लोणावळ्यात मंगळवारी 106 मिमी पावसाची नोंद; अनेक ठिकाणी पाणी साचले

लोणावळा : लोणावळा शहरामध्ये मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट करत जोरदार पाऊस रात्री नऊ वाजेपर्यंत झाला. या चार तासात लोणावळा शहरात तब्बल 106 मिलिमीटर (4.17 इंच) पावसाची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र मध्ये मान्सून सक्रिय झाला आहे. लोणावळा शहरामध्ये काल सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत आपल्या आगमनाची चाहूल दिली. काल झालेल्या जोरदार पावसामुळे लोणावळा शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना घडल्या. प्रशासनाने याची दखल घेत तात्काळ त्या त्या भागातील समस्या सोडवण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा येणाऱ्या पावसामध्ये यापेक्षाही अधिक भयान परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा भावना नागरिक व्यक्त करत आहे.

    लोणावळा शहरामध्ये यावर्षी आतापर्यंत 283 मिलिमीटर (11.14 इंच) पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी मान्सून घाटमाथ्यावर लवकर सक्रिय झाला आहे. पावसाच्या आगमनामुळे उष्णतेने व उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

इतर बातम्या