जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोणावळा शहरामध्ये नगरपरिषद व संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने स्वच्छता मोहीम व वृक्षरोपण
लोणावळा : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोणावळा शहरांमध्ये लोणावळा नगरपरिषद व संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण करण्यात आले.
लोणावळा नगरपरिषदेसमोर संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्टचे सुमारे 2000 एकत्र जमत त्या ठिकाणी या स्वच्छता अभियानाच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर वेगवेगळ्या तुकड्या तयार करत लोणावळा शहरातील सर्व प्रभागांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम, सिंगल यूज प्लास्टिक विरोधी जनजागृती, प्लास्टिक बंदी अभियान, वृक्षारोपण मोहीम, झिरो वेस्ट इव्हेंट तसेच इतर पर्यावरण संवर्धनात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पर्यावरण संरक्षण, स्वच्छता व हरित लोणावळा या संकल्पनेला बळ देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. सदगुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या पावन प्रेरणा व दिव्य आर्शिवादाने संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्रातील व देशभरातील १८ पर्यटन स्थळांवर ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
लोणावळ्याचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्यासह नगरसेवक निखिल कवीश्वर, नगरसेविका स्वप्ना कदम, लक्ष्मी पाळेकर, माझे उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर यांच्यासह अनेक मान्यवर या स्वच्छता मोहिमेच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. लोणावळा शहरातील सर्व 13 प्रभागांमध्ये ही स्वच्छता मोहीम राबवत रस्त्याच्या कडेला असलेला कचरा प्लास्टिकच्या पिशव्या प्लास्टिक बॉटल्स असा शेकडो किलो कचरा गोळा करण्यात आला. संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दरवर्षी पर्यावरण दिनाच्या निमित्त लोणावळा शहरामध्ये ही स्वच्छता मोहीम राबवली जाते.





















