Breaking news

रिक्रूटसीआरएम आणि एलटीआयमाइंडट्री मध्ये विद्यार्थिनींची निवड; सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा गौरव

लोणावळा : सिंहगड इन्स्टिट्यूट्स, लोणावळा कॅम्पसच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी प्राप्त होत आहेत. याच पार्श्वभूमीवर सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SIT), लोणावळा येथील कॉम्प्युटर सायन्स विभागातील बॅच 2026 मधील दोन विद्यार्थिनींची प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.

कॉम्प्युटर सायन्स विभागातील विद्यार्थिनी हर्षदा संजय पाटील हिची RecruitCRM या वेगाने विकसित होत असलेल्या तंत्रज्ञान कंपनीमध्ये ₹6.00 लाख वार्षिक वेतन पॅकेज (CTC) वर निवड झाली आहे. तसेच श्रुती किरण सोनवणे हिची जागतिक स्तरावरील आयटी सेवा व सल्लागार कंपनी LTIMindtree मध्ये ₹4.05 लाख वार्षिक वेतन पॅकेज (CTC) वर निवड झाली आहे.

RecruitCRM ही भरती व्यवस्थापन (Recruitment Management) आणि अर्जदार ट्रॅकिंग प्रणाली (ATS) विकसित करणारी आधुनिक तंत्रज्ञान कंपनी असून ती जगभरातील भरती संस्थांना आणि मानव संसाधन व्यावसायिकांना डिजिटल उपाय उपलब्ध करून देते. LTIMindtree ही माहिती तंत्रज्ञान, डिजिटल परिवर्तन, क्लाउड सेवा, डेटा ॲनालिटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात कार्यरत असलेली जागतिक आयटी सेवा कंपनी असून ती जगभरातील विविध उद्योगांना नाविन्यपूर्ण तांत्रिक उपाय प्रदान करते

या यशाचे श्रेय संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले, संस्थापक सचिव डॉ. सुनंदा नवले, उपाध्यक्ष डॉ. रोहित नवले आणि उपाध्यक्ष डॉ. रचना नवले अष्टेकर यांच्या दूरदर्शी नेतृत्वाला देण्यात आले. त्यांच्या विद्यार्थी-केंद्रित धोरणांमुळे शैक्षणिक गुणवत्ता आणि रोजगाराच्या संधी सातत्याने वाढत आहेत. तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. मयूर राऊत यांचे मार्गदर्शनही मोलाचे ठरले.

विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्य प्रकल्प अधिकारी एसटीईएसचे डॉ. एम. एस. गायकवाड, लोणावळा संकुलाचे संचालक डॉ. शिवाजी देसाई, प्रभारी प्राचार्य डॉ. डी. एस. मंत्री, उपप्राचार्य एस एम गायकवाड तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी, आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी त्यांनी त्याच्या मेहनतीचे कौतुक करत त्याला उज्ज्वल व यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

इतर बातम्या