Breaking news

सृजनरंग २०२६-२७ मध्ये सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या एनएसएस स्वयंसेवकांची बाजी!

लोणावळा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित ‘सृजनरंग २०२६-२७’ या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक व साहित्यिक स्पर्धेत सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लोणावळा येथील एनएसएस स्वयंसेवकांनी उल्लेखनीय यश संपादन केले. विविध स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या यशात मानाची भर घातली.

या स्पर्धेत इंग्रजी निबंध लेखनात तृप्ती हजारे, वॉल पेंटिंगमध्ये आदित्य जंगम, पोवाडा गायनात कृष्ण बाडे, विराज जाधव आणि सुष्मित मुरे, तसेच पथनाट्य स्पर्धेत एनएसएस संघाने प्रथम क्रमांक पटकावला. इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत श्रेया जाधव हिने द्वितीय, तर श्रेया राणी हिने तृतीय क्रमांक मिळवला. हिंदी काव्यवाचनात सोनाली लोहार आणि हिंदी निबंध लेखनात कृतिका सिंग यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. मराठी वक्तृत्वात मैत्रेयी सुतार आणि हिंदी वक्तृत्वात ऋतुजा वटाणे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

या यशामागे एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष दबडे आणि प्रा. सुलक्षणा पाटील यांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांचे परिश्रम महत्त्वाचे ठरले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. मंत्री, उपप्राचार्य डॉ. एस. एम. गायकवाड, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक प्राध्यापकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

इतर बातम्या

भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. एन. श्रीकृष्ण यांच्या प्रमुख उपस्थितीत कैवल्यधाम योग संस्थेचा १०२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा