Breaking news

योग आणि कलेचा त्रिवेणी संगम ! कैवल्यधामचा ‘योगकला महोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न

लोणावळा : योग आणि कलेचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या आणि यंदाच्या वर्षी आपल्या चौथ्या यशस्वी वर्षात पदार्पण केलेल्या ‘योगकला महोत्सव २०२६’ चे आयोजन दि. १० ऑक्टोबर २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाले. यंदाचा हा सोहळा विशेष महत्त्वपूर्ण ठरला, कारण गोर्धनदास सक्सेरिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिस आपल्या योगशिक्षण आणि सांस्कृतिक समन्वयाच्या प्लॅटिनम ज्युबिली (७५ गौरवशाली वर्षे) साजरी करत आहे. या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त आणि गोर्धनदास सक्सेरिया परिवाराच्या मोलाच्या सहकार्याने हा भव्य महोत्सव पार पडला.

विविध स्पर्धांचे आकर्षक सादरीकरण

योग, कला, अभिव्यक्ती आणि सामुदायिक सहभाग यांचा अनोखा मेळ या महोत्सवात पाहायला मिळाला. यानिमित्ताने ‘योगरील’, ‘स्वरयोग’ आणि ‘फ्लोडान्स’ या तीन अभिनव स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विविध वयोगटांतील सहभागी कलाकारांनी आपल्या बहारदार सादरीकरणातून कलागुण, सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि उत्कृष्ट अभिव्यक्तीचे दर्शन घडवून उपस्थितांची मने जिंकली. गोर्धनदास सक्सेरिया परिवार या महोत्सवाचे सहृदय दाते म्हणून लाभला असून, त्यांचे उदार सहकार्य आणि पाठबळ या यशस्वी आयोजनामागे उल्लेखनीय ठरले.

या सोहळ्याला कैवल्यधाम योग संस्थेचे सेक्रेटरी आणि सी.ई.ओ. मा. श्री. सुबोध तिवारी, कैवल्य विद्या निकेतनचे डायरेक्टर डॉ. एन. डी. जोशी, श्री. निशांत जैन, गोर्धनदास सक्सेरिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या प्राचार्या डॉ. बंदिता शतपथी तसेच कैवल्य विद्या निकेतनच्या प्राचार्या भारती कावडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. सर्व मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत सहभागी कलाकारांचे भरभरून कौतुक केले आणि त्यांना प्रोत्साहन दिले.

तज्ज्ञ परीक्षकांचे मार्गदर्शन

स्पर्धेच्या यशस्वी पारदर्शकतेसाठी विविध क्षेत्रातील दिग्गज तज्ज्ञांची परीक्षक म्हणून लाभलेली उपस्थिती लक्षणीय ठरली. यामध्ये

योगरील (परीक्षक) : योगाचार्या संध्या दीक्षित व श्री. विशाल साखला

स्वरयोग (परीक्षक) : पंडित हर्ष दळवी व श्री. कौस्तुभ दिवेकर

फ्लोडान्स (परीक्षक) : श्रीमती ज्योती भोळे व श्रीमती तेजल शेवाळे

स्पर्धेतील विजेते (सन्मानित कलाकार)

योगरील स्पर्धा : प्रथम क्रमांक: आशुतोष पाठिरे

द्वितीय क्रमांक: सायली वायकर

स्वरयोग स्पर्धा : १५ वर्षांपर्यंतचा गट - प्रथम क्रमांक : विघ्नेश्वर संगीत साधना, द्वितीय क्रमांक : SRTIS रायझिंग स्टार

१६ वर्षांवरील गट : प्रथम क्रमांक : सद्गुरु संगीत सागर, द्वितीय क्रमांक : ताजुबाई बाल भजन मंडळ

फ्लोडान्स स्पर्धा (खुला गट) : प्रथम क्रमांक : युज ग्रुप, द्वितीय क्रमांक : मैत्री संगम

Bb. योगकला महोत्सवाने सहभागींच्या कलागुणांना, सर्जनशीलतेला आणि आत्मविश्वासाला एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून, हा प्रेरणादायी सोहळा उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला.

इतर बातम्या

भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. एन. श्रीकृष्ण यांच्या प्रमुख उपस्थितीत कैवल्यधाम योग संस्थेचा १०२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा