Breaking news

Medical Camp l लायन्स क्लब लोणावळा खंडाळा व फ्रँको इंडियन फार्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर

लोणावळा : लायन्स क्लब लोणावळा खंडाळा आणि फ्रँको इंडियन फार्मा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने महावीर क्लिनिक, लोणावळा येथे मोफत युरिक ॲसिड व रक्तातील साखर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल १४९ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

शिबिरादरम्यान नागरिकांची युरिक ॲसिड तसेच रक्तातील साखरेची तपासणी करून आरोग्याबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. दैनंदिन जीवनात आरोग्याची काळजी घेणे, नियमित तपासणी करणे आणि आपल्या जीवनशैलीमध्ये योग्य बदल करणे किती महत्त्वाचे आहे, याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी लायन्स क्लब लोणावळा खंडाळ्याचे अध्यक्ष लायन मंगेश कदम यांनी शिबिरासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मानले. आपल्या दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या गोष्टींचे महत्त्व अधोरेखित करणारी सुंदर उदाहरणे देत त्यांनी उपस्थितांना आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले.

या शिबिराचे ॲक्टिव्हिटी चेअरपर्सन लायन डॉ. पोपट ओसवाल होते. तसेच फ्रँको इंडियन फार्मा कंपनीचे श्री. अवधूत जोशी आणि आर.ई.पी.एल. फार्म कंपनीचे श्री. संतोष गायकवाड यांचे शिबिरासाठी विशेष सहकार्य लाभले. शिबिराला लायन्स क्लबचे खजिनदार लायन रोहित थोरात, लायन स्नेहलता माळी, लायन हेमाक्षणी राजपूत, लायन अभय जैन, लायन देवल पारेख, लायन कांता ओसवाल, लायन निराली नाळेकर, लायन रिंपल पटवा, लायन दीपाली गाला, लायन डॉ. दिलीप सुराणा, लायन डॉ. ऋतुजा तांडेल गोजे, लायन कैलास माळी तसेच श्री. राजाजी खंडेलवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

आरोग्य तपासणीसारख्या उपक्रमातून नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचे कार्य लायन्स क्लब लोणावळा खंडाळा सातत्याने करत असून, भविष्यातही अशा सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

इतर बातम्या

भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. एन. श्रीकृष्ण यांच्या प्रमुख उपस्थितीत कैवल्यधाम योग संस्थेचा १०२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा