Breaking news

मुंबई पुणे एक्सप्रेस वे ठप्प; केमिकलचा टँकर उलटल्याने मुंबई लेन पुर्ण बंद - लोणावळा शहरात प्रचंड वाहतूककोंडी

लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाच्या खाली एक केमिकलच्या टँकर पलटी झाला आहे. या टँकरमधून मोठ्या प्रमाणात केमिकल रस्त्यावर सांडले व त्याचा हवेशी संपर्क आल्याने ते मेणाप्रमाणे झाले आहे. सकाळी सातच्या दरम्यान ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. सदरचे केमिकल रस्त्यावर उतारामुळे लांबवर पसरल्याने मुंबई बाजुकडे जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली असून सर्व वाहने लोणावळा शहरातून जुन्या हायवेवर वळविण्यात आली आहेत. यामुळे लोणावळा शहरात प्रचंड वाहतूककोंडी झाली असून खंडाळा, लोणावळा ते एक्सप्रेस वेच्या वलवण येथील एक्झिट पाॅईटपर्यत वाहनांच्या रांगा गेल्या आहेत.

इतर बातम्या