पुणे जिल्हा महिला पोलीस पाटील संघाच्या अध्यक्ष पदी मावळातील मोनिका अंकुश कचरे यांची निवड
मावळ माझा न्युज नेटवर्क : पुणे जिल्हा महिला पोलिस पाटील संघाच्या अध्यक्ष पदी मोनिका अंकुश कचरे पाटील यांची एकमुखी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, स्वामी शंकरानंदजी महाराज व पांडूरंग महाराज शितोळे यांच्या हस्ते त्यांचा जिल्हाध्यक्ष पदाची सनद देण्यात आली. पहिल्यांदाच हे पद मावळ तालुक्याला भेटलं असून पदग्रहण सोहळा व श्री श्री 1008 आवाहन आखाडा हरिद्वार प्रमुख महामंडलेश्वर आयुर्वेदाचार्य परमपुज्य स्वामी शंकरानंदजी महाराज यांचा अभिष्ठचिंतन सोहळा पार पडला. यावेळी महिलांसाठी हळदी-कुंकु समारंभ, मिरवणूक आणि भव्य रक्तदान शिबीर व विशेष सामाजिक कार्य व क्रिडाक्षेत्रात काम करणा-यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, वारकरी समाज अध्यक्ष नंदकुमार भसे, भंडारा डोंगर येथील अध्यक्ष बाळासाहेब काशीद पाटील, कामशेत पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रविंद्र पाटील, आळंदी येथील पांडुरंग महाराज शितोळे, भाजपा विधानसभा प्रमुख रविंद्र भेगडे, उद्योजक सुधाकर शेळके, माजी नगराध्यक्ष राजु गवळी, संत तुकाराम सह साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, मा. सभापती राजाराम शिंदे, गणेश गायकवाड, किशोर सातकर, मा. नगरसेवक पिं. चि.आप्पा बागल, विनोद महांळुगकर, गजानन शिंदे, महाराष्ट्र राज्य महिला पोलीस पाटील अध्यक्ष तृप्तीताई मांडेकर, पश्चिम महाराष्ट्र महिला कार्याध्यक्ष रोहिणीताई हांडे, साहेबराव राळे, हर्षदाताई संकपाळ, दादा पाटील काळभोर, निलकंठ थोरात, विजयराव कुंजीर, शांताराम सातकर यांच्यासह सर्व गावचे पोलीस पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मणराव शितोळे पाटील यांनी केले तर सुत्रसंचालन चेतन सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अरुण केदारी पाटील, अनिल पडवळ पाटील, संजय जाधव, नवनाथ जांभुळकर, शेडगे पाटील, रोहिणी गराडे,सपना घोजगे, अंजना कदम, महेश चौधरी पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. अंकुशराव कचरे पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले तर राजश्रीताई कचरे पाटील यांनी आभार मानले.