Breaking news

Lonavala News l लोणावळा शहरात ओला उबर वाहने बंद करण्याबाबत आरटीओ अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक संपन्न

लोणावळा : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या बैठकीत ओला उबेर या ऑनलाइन टॅक्सीला लोणावळा शहरात व्यवसाय करण्यास बंदी घालण्याबाबत चर्चा झाली होती. त्या अनुषंगाने मावळचे आमदार सुनील शेळके, पुणे जिल्हा परिवहन विभागाचे अधिकारी, लोणावळा शहर व ग्रामीण पोलीस अधिकारी, स्थानिक टॅक्सी चालक, प्रतिनिधी व आजी-माजी पदाधिकारी यांची महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक लोणावळ्यात 30 जून रोजी संपन्न झाली.

   लोणावळा शहरात लाखो पर्यटक दरवर्षी येत असतात. परंतु ऑनलाईन वाहतुक कंपन्यांमुळे स्थानिकांचा रोजगार हिरावून घेतला जातो. अजितदादांनी बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार ही वाहतूक सेवा लोणावळ्यात बंद झाली पाहिजे अशी सर्वांची मागणी आहे. एग्रीकेटर परवान्यासाठी आवश्यक गोष्टींची व नियमांची पूर्तता न केल्यामुळे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने व जिल्हाधिकाऱ्यांनी ओला, उबेर यासारख्या कंपन्यांना परवाना नाकारला होता. त्याचप्रमाणे आता लोणावळा शहरात देखील ही वाहतूक कायमची बंद राहील याची काळजी आरटीओ अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी मागणी स्थानिक व्यावसायिकांच्या वतीने आमदार सुनिल शेळके यांनी केली. आमच्या स्थानिक भूमिपुत्रांचा हक्काचा रोजगार कोणी हिरावून घेणार नाही यासाठी आम्ही सर्वजण नेहमीच प्रयत्नशील आहोतच. पर्यटकांना उत्तम सेवा देण्यासाठी आमच्या स्थानिक भूमिपुत्रांच्या टॅक्सी व रिक्षा सज्ज असतील, असे त्यांनी मनोगतात सांगितले.

         या बैठकीस आमदार सुनील शेळके यांच्यासह पुणे ग्रामीण परिवहन विभागाचे अधिकारी राहुल जाधव, प्रवीण भोसले, पोलीस निरीक्षक सुहास जगताप, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, किरण गायकवाड, भाजपा गटनेते देविदास कडू, माजी नगरसेवक नारायणभाऊ पाळेकर, निखिल कवीश्वर, श्रीमती मंजुताई वाघ, अरुण लाड, मुकेश परमार, संजय भोईर, बाबा ओव्हाळ, आशिष ठोंबरे, रवि पोटफोडे, भरत चिकणे, सनी पाळेकर, टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष संजय मावकर व योगेश गवळी तसेच शहरातील मान्यवर व टॅक्सी संघटनेचे सभासद उपस्थित होते.

     

इतर बातम्या