Breaking news

निधन वार्ता । महाराष्ट्र पोलीस मेगासीटीचे संस्थापक महंमदरफी खान यांचे निधन

पुणे : लोहगाव पुणे येथील महाराष्ट्र पोलीस मेगासीटीचे मूळ संस्थापक तथा प्रथम सचिव महंमदरफी चांदसाहेब खान (वय 65 वर्षे) यांचे शुक्रवारी (24 फेब्रुवारी) पुण्यात हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले. चार दिवसांपूर्वी फातिमानगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार विवाहित बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार अमिन खान यांचे ते मावसभाऊ होत.

      राज्याच्या पोलीस दलात त्यांनी औरंगाबाद, पुणे आदी शहरात पोलीस निरीक्षक म्हणून 36 वर्षे सेवा केली. दरम्यान, पोलिसांना हक्काची घरे मिळावीत म्हणून त्यांनी सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना केली. औरंगाबाद, लातूर, नांदेड आणि पुणे लोहगाव येथील सुमारे 800 कोटीं रुपयांचा महाराष्ट्र पोलीस मेगासीटी प्रकल्प त्यांनी पोलीस, गृह आणि न्यायालयीन विभागातील आजी माजी कर्मचाऱ्यांसाठी आग्रहाने स्थापित केला. त्यांना पोलीस महासंचालक पदक, राष्ट्रपती पदकाने देखील गौरविण्यात आले होते. शुक्रवारी येरवडा कब्रस्तान येथे त्यांच्यावर दफनसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस खात्यातील आजी माजी वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.

इतर बातम्या